शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

दराडेंच्या विजयासाठी थेट ‘मातोश्री’चा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:48 IST

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची शिवसेनेची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना जाहीर झाल्यानंतर उफाळून आलेल्या पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी थेट ‘मातोश्री’ने हस्तक्षेप केला असून, सोमवारी यासंदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत नाशिकमधून सेनेचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे, असे आदेश दिल्याने दराडे यांना हायसे वाटले आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची शिवसेनेची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना जाहीर झाल्यानंतर उफाळून आलेल्या पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी थेट ‘मातोश्री’ने हस्तक्षेप केला असून, सोमवारी यासंदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत नाशिकमधून सेनेचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे, असे आदेश दिल्याने दराडे यांना हायसे वाटले आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या एका गटाने नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करून पक्षाकडून तिकीट मिळविल्यावरून सेनेंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. दराडे यांना एकीकडे उमेदवारी जाहीर करताना दुसरीकडे उमेदवारीचे दावेदार शिवाजी सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने या गटबाजीत भर पडली, शिवाय महानगरप्रमुखही तत्काळ बदलण्यात आल्याने सेनेतील वातावरण सैरभैर झाले होते. अशा परिस्थितीत पक्षाच्या बैठकांकडे एका गटाने पाठ फिरविण्याची भूमिका घेत नाराजीचे जाहीर प्रदर्शन घडविल्याचा फटका थेट संपर्क प्रमुख व नेत्यांनाही बसल्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत सेना उमेदवाराचे भवितव्य धोक्यात असल्याचा अंदाज पक्ष प्रमुखांना आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर खुद्द दराडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही पक्षाचे सदस्य प्रतिसाद देत नसल्यामुळे अखेर या वादात उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला व त्यासाठी सोमवारी सकाळी ‘मातोश्री’वर बैठक घेण्यात आली. ठाकरे यांनी आकडेवारी वगैरे मला सांगत बसू नका, उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आला पाहिजे, अशी तंबीच उपस्थिताना दिली.  या बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.युतीबाबत संभ्रम तोडाया बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी यापुढच्या कोणत्याही निवडणुकीत भाजपाबरोबर युती होणार नसल्याचे सांगत या संदर्भातील संभ्रम मोडीत काढा, असे पदाधिकाºयांना सांगितले. शिवसेना राज्यातील तीन विधान परिषदेच्या जागांवर उमेदवार उभे करणार असून, अन्य तीन जागा लढवणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपासोबत युती होणार नसली तरी, भाजपा सेनेला पाठिंबा देण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक