शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्व सुरक्षा योजनांचे लाभच असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:00 IST

माता आणि तिच्या बाळाचे पुरेसे पोषण आणि संगोपन व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या आर्थिक लाभावर त्यांच्या पतीचा डोळा असल्यामुळे माता सुरक्षा योजनाच असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. पत्नीला मिळणारे लाभ त्यांचे पती परस्पर काढून घेत असल्यामुळे या योजनांचे आर्थिक लाभ आता बॅँकेत न जमा करता टपाल खात्यात जमा करण्याचा सल्ला शासनाच्या आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.

नाशिक : माता आणि तिच्या बाळाचे पुरेसे पोषण आणि संगोपन व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या आर्थिक लाभावर त्यांच्या पतीचा डोळा असल्यामुळे माता सुरक्षा योजनाच असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. पत्नीला मिळणारे लाभ त्यांचे पती परस्पर काढून घेत असल्यामुळे या योजनांचे आर्थिक लाभ आता बॅँकेत न जमा करता टपाल खात्यात जमा करण्याचा सल्ला शासनाच्या आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.  आदिवासी आणि ग्रामीण भागातील कुपोषण तसेच माता-बालकांच्या मृत्यूचे प्रकार रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांतर्गत मातांना संगोपन आणि पोषण आहारासाठी आर्थिक लाभ दिले जातात. हे आर्थिक लाभ शासनाकडून बॅँकेत जमा होत असल्याने बॅँकेतून ही रक्कम त्यांचे पती काढून घेत असल्याने या योजनांचा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी आणि अतिदुर्गम तसेच ग्रामीण भागात बॅँक असतेच असे नाही. बॅँक असलीच तर ती तालुक्याच्या ठिकाणी असते. त्यामुळे लाभार्र्थी अशा परिस्थितीत बॅँकेत जाऊन पैसे काढू शकत नाही किंवा त्यांना घराबाहेर पडणे कठिण असते. त्यामुळे हे पैसे बॅँकेच्या स्लीपवर त्यांचे पतीच काढून घेत असल्याने मूळ लाभार्थी महिलांपर्यंत हे पैसे पोहचतच नाही. त्यामुळे माता-बाल संगोपनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. कित्येकता बॅँकेच्या स्लीपवर पत्नीचा अंगठा किंवा सही करून रक्कम परस्पर काढली जाते. बॅँक दूरवर असल्यामुळे पतीच्या आग्रहास्तव आणि महिलांना अशा परिस्थितीत बॅँकेत येणे शक्य नसल्यामुळे बॅँकेकडूनही फारशी अडवणूक केली जात नाही. या प्रकारामुळे मात्र मूळ लाभार्थींपर्यंत योजनेची रक्कम पोहचत नाही. त्यामुळे आता टपाल कार्यालयाचा पर्याय समोर आला आहे. ही गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने आता माता बाळांचे आर्थिक लाभ हे सुरक्षित राहावे यासाठी गावातील टपाल कार्यालयातून त्यांना आर्थिक लाभ देण्याचा विचार शासनाने सुरू केला आहे. लाभाची रक्कम बॅँकेत जमा न करता ती टपाल खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुर्गम भागात तसेच खेडोपाडी गावात टपाल कार्यालय असल्यामुळे आणि अवघ्या ५० रुपयांत बॅँकेत खाते उघडता येत असल्यामुळे महिलांनी बॅँकेत खाते उघडावे यासाठी आरोग्य विभागाकडून प्रबोधन केले जात आहे. गावातच टपाल कार्यालय असल्याने संबंधित महिला टपाल कार्यालयातून जाऊन आपल्या खात्यातून रक्कम काढून घेऊ शकते. यामुळे काही प्रमाणात तरी महिलांपर्यंत लाभ पोहचतील अशी अपेक्षा आहे.अशा आहेत योजनागरोदर माता आणि त्यांच्या बाळांसाठीं मातृवंदन योजना, जननी सुरक्षा योजना तसेच कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक लाभ दिले जातात. मातृवंदन योजनेन गरोदर महिलांना ६००० रुपये, जननी सुरक्षा योजनेत बाळंतपणानंतर ६०० रुपये, तर कुटुंबकल्याण योजनेंतर्गत २००० रुपये रोख आणि ८०० रुपये मुलीच्या नावे डिपॉझिट केले जातात. या योजनांमुळे माता-बालक यांचे संगोपन होऊन त्यांना सुदृढ करण्यासाठी आर्थिक लाभ दिले जातात.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद