शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जुळता भूतदयेचे सूर, चालू लागले खूर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:58 PM

जनावरांच्या सुरक्षेसह आरोग्याच्या प्रश्नावर ‘लोकमत’मधून नेहमी जनजागृती करण्यात येते. पिंपळगाव येथील खूर वाढलेल्या गाईच्या जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच ‘मुक्या जनावरांच्या हुंदक्याचे चालणे कुणाला कळावे’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गाईला जीवदान मिळाले आहे. तिष्ठत असलेल्या गाईच्या हालचाली आणि चालणे पाहताच ‘जुळता भूतदयेचे सूर अन् चालू लागले खूर’ या काव्यपंक्ती आपसूकच उपस्थितांच्या मनात घर करून गेल्या.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : सामाजिक कार्यकर्त्यांमुळे मिळाले गाईला जीवदान; वेदनादायी कसरत थांबली

पिंपळगाव बसवंत : जनावरांच्या सुरक्षेसह आरोग्याच्या प्रश्नावर ‘लोकमत’मधून नेहमी जनजागृती करण्यात येते. पिंपळगाव येथील खूर वाढलेल्या गाईच्या जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच ‘मुक्या जनावरांच्या हुंदक्याचे चालणे कुणाला कळावे’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गाईला जीवदान मिळाले आहे. तिष्ठत असलेल्या गाईच्या हालचाली आणि चालणे पाहताच ‘जुळता भूतदयेचे सूर अन् चालू लागले खूर’ या काव्यपंक्ती आपसूकच उपस्थितांच्या मनात घर करून गेल्या.शहरातील बसस्थानक व परिसरात लोकांची नेहमीच वर्दळ असते. तर काही मोकाट प्राण्यांचीही गर्दी असते. त्यातीलच एक लाल-भुरक्या रंगाची गाय अतिशय अवघड स्थितीत जीवन जगत असल्याचे दिसत होती. अनेक दिवसांपासून या गायीच्या चारही पायांच्या खुरांची वाढ झालेली होती. त्यामुळे तिला चालणे मुश्कील झाले होते.याशिवाय उदरनिर्वाहासाठी चारा शोधताना इतर जनावरांबरोबर स्पर्धा करत तिला अतिशय वेदनादायी कसरत करावी लागत होती.‘लोकमत’मध्ये १४ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्राणिमित्रांकडून हळहळ व्यक्त झाली व तिच्या वाढलेल्या खुरा आॅपरेशन अथवा अन्य वैद्यकीय मार्गाने तिला संजीवनी देण्याच्या हलचाली सुरू झाल्या. खेडगाव महाविद्यालयातील राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी विकास शिंदे यांनी वृत्त वाचल्यानंतर पिंपळगाव बसवंत बसस्थानक गाठले. स्वत: त्या गाईची परिस्थिती बघितली. पशुवैद्यकीय अधिकारी व स्थानिक प्राणिमित्रांसह गोरक्षक यांच्या भेटी घेतल्या. यानंतर कादवा कारखाना परिसरात गाईच्या खुरासाठी काम करणाऱ्या गणेश चव्हाण पत्रिवाले यांना भेटून त्यांना गाईच्या वाढलेल्या खुरांची माहिती देत पिंपळगावला घेऊन आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अल्पेश पारख, अमित डेरे, रवींद्र कडाळे, नीलेश सोनवणे यांना सोबत घेऊन त्या गाईच्या खुरांची कापणी करण्यात आली. विकास शिंदे पुढाकाराने गाईला जीवदान मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

समाजातील प्रत्येक घटकांनी अशा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समस्यांकडे सामाजिक जबाबदारीने पाहिले पाहिजे. मुक्या प्राण्यांची अवहेलना होणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ‘लोकमत’ वर्तमानपत्रातील वृत्त वाचल्यानंतर प्रत्यक्ष गाईची परिस्थिती पाहिली. पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गाईला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. गाईवर उपचार केले असून, लवकच ती पूर्णपणे तंदुरुस्त होणार असल्याचा आनंद आहे.- विकास शिंदे, कार्यक्र म अधिकारी, रासेयो, खेडगाव

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार