जुळता भूतदयेचे सूर, चालू लागले खूर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:58 PM2019-12-23T23:58:45+5:302019-12-24T00:00:22+5:30

जनावरांच्या सुरक्षेसह आरोग्याच्या प्रश्नावर ‘लोकमत’मधून नेहमी जनजागृती करण्यात येते. पिंपळगाव येथील खूर वाढलेल्या गाईच्या जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच ‘मुक्या जनावरांच्या हुंदक्याचे चालणे कुणाला कळावे’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गाईला जीवदान मिळाले आहे. तिष्ठत असलेल्या गाईच्या हालचाली आणि चालणे पाहताच ‘जुळता भूतदयेचे सूर अन् चालू लागले खूर’ या काव्यपंक्ती आपसूकच उपस्थितांच्या मनात घर करून गेल्या.

Matching ghostly tones, turning to the hoof ..! | जुळता भूतदयेचे सूर, चालू लागले खूर..!

पिंपळगाव येथे खूर काढल्यानंतर उभी राहिलेली गाय पाहून आनंद व्यक्त करताना विकास शिंदे, अल्केश चौधरी, अमित डेरे, रवि कडाळे, वैभव नवगे, नीलेश सोनवणे, गणेश चव्हाण आदी.

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : सामाजिक कार्यकर्त्यांमुळे मिळाले गाईला जीवदान; वेदनादायी कसरत थांबली

पिंपळगाव बसवंत : जनावरांच्या सुरक्षेसह आरोग्याच्या प्रश्नावर ‘लोकमत’मधून नेहमी जनजागृती करण्यात येते. पिंपळगाव येथील खूर वाढलेल्या गाईच्या जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच ‘मुक्या जनावरांच्या हुंदक्याचे चालणे कुणाला कळावे’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गाईला जीवदान मिळाले आहे. तिष्ठत असलेल्या गाईच्या हालचाली आणि चालणे पाहताच ‘जुळता भूतदयेचे सूर अन् चालू लागले खूर’ या काव्यपंक्ती आपसूकच उपस्थितांच्या मनात घर करून गेल्या.
शहरातील बसस्थानक व परिसरात लोकांची नेहमीच वर्दळ असते. तर काही मोकाट प्राण्यांचीही गर्दी असते. त्यातीलच एक लाल-भुरक्या रंगाची गाय अतिशय अवघड स्थितीत जीवन जगत असल्याचे दिसत होती. अनेक दिवसांपासून या गायीच्या चारही पायांच्या खुरांची वाढ झालेली होती. त्यामुळे तिला चालणे मुश्कील झाले होते.
याशिवाय उदरनिर्वाहासाठी चारा शोधताना इतर जनावरांबरोबर स्पर्धा करत तिला अतिशय वेदनादायी कसरत करावी लागत होती.
‘लोकमत’मध्ये १४ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्राणिमित्रांकडून हळहळ व्यक्त झाली व तिच्या वाढलेल्या खुरा आॅपरेशन अथवा अन्य वैद्यकीय मार्गाने तिला संजीवनी देण्याच्या हलचाली सुरू झाल्या. खेडगाव महाविद्यालयातील राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी विकास शिंदे यांनी वृत्त वाचल्यानंतर पिंपळगाव बसवंत बसस्थानक गाठले. स्वत: त्या गाईची परिस्थिती बघितली. पशुवैद्यकीय अधिकारी व स्थानिक प्राणिमित्रांसह गोरक्षक यांच्या भेटी घेतल्या. यानंतर कादवा कारखाना परिसरात गाईच्या खुरासाठी काम करणाऱ्या गणेश चव्हाण पत्रिवाले यांना भेटून त्यांना गाईच्या वाढलेल्या खुरांची माहिती देत पिंपळगावला घेऊन आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अल्पेश पारख, अमित डेरे, रवींद्र कडाळे, नीलेश सोनवणे यांना सोबत घेऊन त्या गाईच्या खुरांची कापणी करण्यात आली. विकास शिंदे पुढाकाराने गाईला जीवदान मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


समाजातील प्रत्येक घटकांनी अशा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समस्यांकडे सामाजिक जबाबदारीने पाहिले पाहिजे. मुक्या प्राण्यांची अवहेलना होणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ‘लोकमत’ वर्तमानपत्रातील वृत्त वाचल्यानंतर प्रत्यक्ष गाईची परिस्थिती पाहिली. पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गाईला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. गाईवर उपचार केले असून, लवकच ती पूर्णपणे तंदुरुस्त होणार असल्याचा आनंद आहे.
- विकास शिंदे, कार्यक्र म अधिकारी, रासेयो, खेडगाव

Web Title: Matching ghostly tones, turning to the hoof ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.