शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जुळल्या ‘त्यांच्या’ जन्माच्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:24 IST

नियतीने कोणाच्या पदरात जन्मत: व्यंग टाकले, तर काहींच्या नशिबी अपघाताने अपंगत्व आले; मात्र जिद्दीने या संकटावर मात करत जीवनाचा संघर्ष करणाºयांची संख्या समाजात मोठी आहे. त्यांनाही सर्वसामान्यांसारखा जगण्याचा हक्क असून, संसार थाटण्याच्या अपेक्षाही ते बाळगून आहेत; मात्र गरज आहे ती त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची. अशाच एका विवाहेच्छुकांच्या परिचय मंचावर तीन युवक-युवतींना एकमेकांचा जीवनासाथी लाभला आणि त्यांच्या रेशीमगाठी जुळल्या.

नाशिक : नियतीने कोणाच्या पदरात जन्मत: व्यंग टाकले, तर काहींच्या नशिबी अपघाताने अपंगत्व आले; मात्र जिद्दीने या संकटावर मात करत जीवनाचा संघर्ष करणाºयांची संख्या समाजात मोठी आहे. त्यांनाही सर्वसामान्यांसारखा जगण्याचा हक्क असून, संसार थाटण्याच्या अपेक्षाही ते बाळगून आहेत; मात्र गरज आहे ती त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची. अशाच एका विवाहेच्छुकांच्या परिचय मंचावर तीन युवक-युवतींना एकमेकांचा जीवनासाथी लाभला आणि त्यांच्या रेशीमगाठी जुळल्या.  निमित्त होते, लायन्स क्लब आॅफ नाशिक सुप्रीम व राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सोमवारी (दि. २५) पार पडलेल्या अंध-अपंग व मूकबधिर विवाहेच्छुक युवक-युवतींच्या परिचय मेळाव्याचे. रोटरी सभागृहात पार पडलेल्या या परिचय सोहळ्यात तिघा युवक-युवतींना एकमेकांच्या जीवनाचा जोडीदार लाभला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. सुहास फरांदे, नंदलाल पारख, राजेंद्र पारख, धनंजय बेळे, छगाबाई पारख, लायन्स क्लबचे अध्यक्ष हंसराज देशमुुख, उद्योजक धनंजय बेळे, सचिन शहा, सतीश कोठावदे, अजय आहुजा आदी उपस्थित होते.  यावेळी फरांदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, विवाह हा दोन कुटुंबांना जोडणारा धागा असतो. दिव्यांग युवक-युवतींमध्येदेखील एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते आणि तेही समाजाच्या मुख्य प्रवाहात राहून दैनंदिन जीवन जगू शकतात व तसा आत्मविश्वास त्यांनी बाळगण्याची गरज आहे.  पारख यांनी मनोगतामधून या उपक्रमाची माहिती देत सांगितले, मागील वर्षी या परिचय मेळाव्यातून २० युवक-युवतींचा विवाह जुळून आला होता.मेळाव्यात नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्र तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. देशमुख यांनी प्रास्ताविक, तर सतीश कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. यांना लाभला जीवनसाथी मेळाव्यामध्ये भारती बाळू डोढक (ओझर) यांचा नवनाथ पाटील यांच्याशी पुष्पा जाधव (जेलरोड) यांचा चेतन पारख यांच्याशी, तर आशा शेटे (चाळीसगाव) यांचा राजन सदडे या युवकाबरोबर विवाह जुळल्याचे संयोजकांनी सांगितले. बहुतांश विवाहेच्छुकांनी पसंतीनुसार माहितीपत्रकात माहिती नोंदविली असून, या मेळाव्याच्या माध्यमातून अजून विवाह जमून येण्यास मदत होणार असल्याचे पारख म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक