शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाच्या विरोधात मातंग समाजाचा नाशिकमध्ये मोर्चा

By श्याम बागुल | Updated: August 29, 2018 15:41 IST

गोल्फ क्लब मैदानावरून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. तत्पुर्वी जिल्ह्यातील कानाकोपºयातून शेकडो वाहनांनी सकाळपासूनच मातंग बांधवांनी मैदानावर गर्दी केली होती. ‘जय लहूजी’ लिहीलेले दुपट्टे, पिवळे ध्वज हातात घेवून निघालेला मोर्चा त्र्यंबक नाक्यावरून जिल्हा परिषद मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर

ठळक मुद्देशक्तीप्रदर्शन : मुलींनी दिले मागण्यांचे निवेदनअ‍ॅट्रासिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी

नाशिक : राज्यात मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ व संविधानाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी बुधवारी मातंग समाजाने शक्तीप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अ‍ॅट्रासिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी व मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.गोल्फ क्लब मैदानावरून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. तत्पुर्वी जिल्ह्यातील कानाकोपºयातून शेकडो वाहनांनी सकाळपासूनच मातंग बांधवांनी मैदानावर गर्दी केली होती. ‘जय लहूजी’ लिहीलेले दुपट्टे, पिवळे ध्वज हातात घेवून निघालेला मोर्चा त्र्यंबक नाक्यावरून जिल्हा परिषद मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर नेण्यात आला. त्याठिकाणी साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बी. डी. भालेकर मैदानावर मोर्चा विसर्जित करण्यात येवून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जावून मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने महाराष्टÑातील प्रत्येक जिल्ह्यात मातंग समाजातील व्यक्तीं, मुलींवर अत्याचार करण्यात आला असून, मारेकºयांना कठोर शासन करावे, मनुस्मृतीचे समर्थन करणारे संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, अ‍ॅट्रासिटी कायद्याची कठोर अंमलबजाावणी करण्यात यावी, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सर्व मंजुर शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, साठे महामंडळाचे भाग भांडवल वार्षिक एक हजार कोटी करण्यात यावी, साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, मातंग समाज, मांग-गारूडी समाज यांचे सर्व्हेक्षण करून त्यांना दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात राजुभाऊ वैरागर, संतोष अहिरे, यु.के. अहिरे, सचिन नेटारे, सुनील अहिरे, अशोक साठे, यशवंत शिरसाठ, राजु कांबळे, गोपाळ बस्ते, साहेबराव श्रृंगार, ओंकार सपकाळे, सुर्यकांत भालेराव, विठ्ठल नाडे, अनिल निरभवणे यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक