शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरीवरून मातोरीचे ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:50 IST

मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील यांनी मध्यस्थीने वाद टाळला आहे.

मातोरी : मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील यांनी मध्यस्थीने वाद टाळला आहे.  यंदा पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे आत्तापासूनच शेतकºयांना भविष्यातील दुष्काळाची चाहूल लागली असून, पाण्यावरून वाद होत आहेत. तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी खूपच खालावली असून, मातोरीकरांना संजीवनी ठरणारा पाझरतलाव महिनाभरात कोरडाठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया आळंदी धरणातील आवर्तने कमी होऊ नये व जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी सय्यद पिंपरी, आडगाव, मातोरी, मखमलाबाद, दरी, मनोली येथे शेतकरी सभा घेत असताना गावातील पाझरतलावातील पाणी मखमलाबाद गावातील संपत पिंगळे यांनी मोटारीच्या सहाय्याने शेतीसाठी उपसण्यास सुरुवात केली आहे.सुमारे महिनाभर चाललेल्या या पाणीचोरीमुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याबाबत संबंधितांना समजही देण्यात आली.जनावरांसाठी पाणी शिल्लक ठेवावेपाणीचोरी होत असल्याचे दिसत असताना शुक्रवारी शेतकरी एकवटले व त्यातून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सरपंच शरद तांदळे व पोलीस पाटील रमेश पिंगळे, ग्रामसेवक मवाळ यांनी सदर मोटारपंप काढून घेण्याची व शेतकºयावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने वाद टळला. मातोरीच्या पाझरतलावात जेमतेम स्वरूपात पाणी साठा शिल्लक राहिला असून, निदान जनावरांना जगण्यासाठी तरी पाणी शिल्लक ठेवावे, अशी शेतकºयाची मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत