शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सहा राज्यांतून शंभर किलो सोने लूटणारा कुख्यात सुबोधसिंग नाशिकच्या दरोड्याचा मास्टरमाइंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:37 IST

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील कुख्यात गुंड सुबोधसिंग उंटवाडी ‘मुथूट’ दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सुबोधसिंग सध्या तुरुंगात असला तरी त्याने तुरुंगातून त्याच्या हस्तकांच्या टोळीशी

ठळक मुद्देपरमेंदर हा सुबोधसिंगचा मुख्य हस्तक आहे.परमेंदर हा दरोड्यातील मूळ शूटर

नाशिक : देशभरातील सहापेक्षा अधिक राज्यांमधील विविध शहरांत मुथूट, मण्णपुरम फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांवर सशस्त्र दरोडे टाकून सुमारे शंभर किलोपेक्षा अधिक सोन्याच्या दागिन्यांची लूट करणारा बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील कुख्यात गुंड सुबोधसिंग उंटवाडी ‘मुथूट’ दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सुबोधसिंग सध्या तुरुंगात असला तरी त्याने तुरुंगातून त्याच्या हस्तकांच्या टोळीशी संपकर् ात राहून दरोडा टाकण्यास भाग पाडल्याची कबुली या दरोड्यातील शूटर सराईत गुंड परमेंदर सिंग याने पोलिसांना दिली आहे.मागील वर्षी पाटणा पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर व सोने लुटीच्या घटनांचा मास्टरमाइंड असलेल्या सुबोधसिंगला अटक केली होती. तो कारागृहात शिक्षा भोगत असला तरी त्याचे हस्तक उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांमध्ये सक्रिय असल्याने तो कारागृहातून त्यांच्या संपकर् ात राहून दरोड्याच्या घटना घडवून आणत असल्याचे आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत संबंधित कारागृहाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुबोधसिंगवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्टत परराज्यातून येऊन धाडसी दरोड्याच्या घटना थांबविण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. मुथूट फायनान्स दरोडा व खुनाच्या गुन्ह्यात सुबोधसिंगचा हस्तक परमेंदर हाती लागला आहे. परमेंदरसह त्याच्या दहा साथीदार असे एकूण ११ सराईत दरोडेखोरांनी हा हल्ला घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.दरोड्यातील मूळ शूटर परमेंदर हा ५ जून रोजी कार्बन नाका सातपूर परिसरात दाखल झाला. त्याला आकाशसिंग राजपूत याने फोन करून बोलावून घेतले. परमेंदर काही वर्षे उत्तर प्रदेशच्या एका माजी मंत्र्याच्या घरात भाडेतत्त्वावरदेखील राहात होता, असे तपासात पुढे आले आहे. हा सुबोधसिंगचा मुख्य हस्तक आहे. त्याच्या इशा-यावरूनच कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

शहरात १५ दिवस मुक्कामया गुन्ह्यातील संशयित राहूल व अनुज उर्फ पप्पू, परमेंदर, जितेंद्रसिंग राजपूत, आकाशसिंग राजपूत हे संशयित आरोपी दरोडा टाकण्यापुर्वी शहरात १५ दिवस मुक्कामी होते. त्यांनी गुगुलमॅपच्या अधारे परिसरातील रस्त्यांची माहिती करून घेत नकाशे तयार केले. त्यानुसार संपुर्ण भागाची प्रत्येकाने ‘रेकी’ केली. परमेंदर हा दोन ते तीन वेळा सकाळच्या सुमारास फायनान्स कार्यालयात गौरवसिंग नावाने ये-जा क रून आला होता.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyदरोडाFiringगोळीबार