शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मुसळधार; गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:48 IST

गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे नदीपात्रात ६ हजार ५६० क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे.

ठळक मुद्दे५११६ क्युसेकने बुधवारी दुपारपर्यंत विसर्ग सुरू होता; गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग दुपारी एक वाजता ४५४५ क्युसेक तर दोन वाजता ३४४५ आणि चार वाजता २८७४ क्युसेकवर आणला गेला; बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत त्र्यंबकला १२, गंगापूर ११ तर काश्यपी ३८, गौतमी-गोदावरीच्या परिसरात ६९ आणि अंबोली परिसरात ७४ मि.मि इतक्या पावसाची नोंद करण्यात आली

नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून मंगळवारी पावसाचा जोर कमी राहिला होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे नदीपात्रात ६ हजार ५६० क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. गंगापूर धरणातून मंगळवारी रात्री बारा वाजता विसर्ग वाढविण्यात आला होता. ५११६ क्युसेकने बुधवारी दुपारपर्यंत विसर्ग सुरू होता; गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग दुपारी एक वाजता ४५४५ क्युसेक तर दोन वाजता ३४४५ आणि चार वाजता २८७४ क्युसेकवर आणला गेला; मात्र शहरात चार वाजेपासून पावसाला पुन्हा जोरदार सुरूवात झाल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत त्र्यंबकला १२, गंगापूर ११ तर काश्यपी ३८, गौतमी-गोदावरीच्या परिसरात ६९ आणि अंबोली परिसरात ७४ मि.मि इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकू णच गंगापूर धरण समुहातील गौतमी, काश्यपी, अंबोली या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला.