आझादनगर : मालेगाव येथील अब्दुल लतिफ बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी सायंकाळी २१ जोेडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास कचौचा शरीफ (उ. प्र.) चे मौलाना सय्यद अबूबकर मिया, आमदार आसिफ शेख, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक मसूद खान, मनपा सभागृह नेता कलीम दिलावर यांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना आशीर्वाद दिले.आझादनगर परिसरातील मुन्शी शाबाननगर येथील अब्दुल लतीफ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गत पाच वर्षांपासून गरीब व गरजू, विधवा महिलांच्या मुला-मुलींचे स्वखर्चाने थाटामाटात लग्न लावून (निकाह करून) देते. विवाह सोहळ्यादरम्यान संस्थेतर्फे नवदाम्पत्यांना पलंग, गादी, कपाटासह, गृहोपयोगी सर्व भांड्यांचा संच भेट देण्यात आला. सोहळ्यास शहरातील सर्वच स्तरातील मान्यवर उपस्थित होते. रईस कासमी यांनी सूत्रसंचालन केले. मोहंमद आरीफ अब्दुल लतिफ शेख यांनी आभार मानले.
मालेगावी २१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा
By admin | Updated: January 16, 2017 01:09 IST