नाशिक : कौटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्या चौघांनी विवाहितेच्या पतीस बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि़ १७) रात्रीच्या सुमारास पेठरोडवरील अश्वमेघनगरमध्ये घडली़ रामदास वामन चोथवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी सकाळच्या सुमारास त्यांचे पत्नीसोबत भांडण सुरू असताना परिसरातील दीपक चोथे व त्याचे तीन साथीदार आले़ त्यांनी या कौटुंबिक वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता रामदास चोथवे यांनी आमचा कौटुंबिक वाद आहे तुम्ही निघून जा असे सांगितले़ या चौघांनाही या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी रामदास चोथवे यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
विवाहितेच्या पतीस टोळक्याकडून मारहाण
By admin | Updated: October 20, 2016 02:39 IST