नाशिकरोड : जेलरोड येथे २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे.जेलरोड देशमुख भवनजवळील राजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारी कॅथरिना इदाया झेवियर्स या विवाहितेने गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.युवकाची आत्महत्त्यावाशीम जिल्ह्यातील आनसिंग येथील युवक प्रदीपसिंग रामसिंग चव्हाण (वय २३) या युवकाने गुरुवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून कामायनी एक्स्प्रेसमधून उडी मारून आत्महत्त्या केली. रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.विद्यार्थी बेपत्तानाशिक-पुणे महामार्ग शिवाजीनगर येथील मनमयुर अपार्टमेंटमध्ये राहणारा विद्यार्थी स्वराज अशोक कोंढरे (वय १७) याला १२ वी सीईटीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याच्या वडिलांनी रागविले होते. या गोष्टीचा राग आल्याने स्वराज हा गुरुवारी रात्री १० वाजता घरात कुणालाही काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला आहे. उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेची आत्महत्त्या
By admin | Updated: June 3, 2016 23:05 IST