शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी बाजारपेठ होणार ठप्प ; बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:17 IST

आॅनलाइन खरेदी-विक्रीची प्रक्रिया, मोठमोठ्या मॉलमधून विविध दैनंदिन गरजेच्या लोकोपयोगी वस्तूंच्या होणाऱ्या घाऊक व किरकोळ विक्रीमुळे किरकोळ व्यापार अडचणीत सापडला आहे. यामुळे व्यापारावर होणाºया परिणामांवर चर्चा करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात बुधवारी (दि. २६) बैठक बोलविण्यात आली होती.

नाशिक : आॅनलाइन खरेदी-विक्रीची प्रक्रिया, मोठमोठ्या मॉलमधून विविध दैनंदिन गरजेच्या लोकोपयोगी वस्तूंच्या होणाऱ्या घाऊक व किरकोळ विक्रीमुळे किरकोळ व्यापार अडचणीत सापडला आहे. यामुळे व्यापारावर होणाºया परिणामांवर चर्चा करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात बुधवारी (दि. २६) बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत येत्या शुक्रवारी (दि.२८) भारत व्यापार बंदला नाशिकमधील व्यापारी संघटना पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.  मॉल व आॅनलाइन बाजार संस्कृतीला संघटितपणे विरोध करण्यासाठी शुक्रवारी भारत व्यापार बंदला शहरातील सर्व व्यापारी पाठिंबा देत कडकडीत बंद पाळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राठी सभागृहात चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, राजेश मालपुरे, भावेश मानेक उपस्थित होते. शुक्रवारी चांदीच्या गणपतीची आरती करून सर्व व्यापारी बंदमध्ये सहभागी होणार आहे. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. भारत व्यापार बंदला महाराष्ट्र चेंबरचा पाठिंबा असल्याचे मंडलेचा यावेळी म्हणाले. चेंबर व्यापाºयांच्या पाठीशी आहे.बुधवारी (दि.१९) मुंबईला महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत भारत व्यापार बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नाशिक किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते, नाशिक मोटार मर्चंटचे अध्यक्ष चढ्ढा, हार्डवेअर मर्चंटचे संतोष लोढा, प्लायवुड मर्चंटचे हसमुख पोकार, नाशिक मोटार मर्चंटचे सुरेश चावला आदींसह विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी चर्चेत सहभाग घेत मते मांडली. संपूर्ण नाशिक बंद ठेवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सर्व व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून भारत व्यापार बंद आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

टॅग्स :businessव्यवसायonlineऑनलाइन