शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून शिक्षणाचे बाजारीकरण :  कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:10 IST

राज्यातील सध्याची शिक्षणव्यवस्था व शिक्षक मोडीत काढून केवळ शिक्षणाचे व्यापारीकरण बाजारीकरण करण्याचे काम भाजपा सरकार करते आहे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले.

मालेगाव : राज्यातील सध्याची शिक्षणव्यवस्था व शिक्षक मोडीत काढून केवळ शिक्षणाचे व्यापारीकरण बाजारीकरण करण्याचे काम भाजपा सरकार करते आहे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले. येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात शिक्षक भारतीच्या वतीने नाशिक विभागीय मेळावा घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पाटील बोलत होते. शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, नाना बोरस्ते राज्याध्यक्ष नवनाथ गेंद, भरत शेलार, दिनेश खोसे, राजेंद्र लोंढे, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती अनिल तेजा आदी उपस्थित होते.  राज्यमंत्री भुसे म्हणाले, शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून आमदार कपिल पाटील सभागृहात असावे, अशी सर्वांची भावना आहे. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत लवकरच शिक्षण सचिवांच्या समवेत बैठक लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रारंभी भरत शेलार यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्ताने नाशिक विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन के. के. अहिरे यांनी केले. मेळाव्यास शहर व तालुक्यासह धुळे, जळगाव, नगर येथील मोठ्या संख्येने प्राथमिक माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सध्याच्या राज्यकर्त्यांना कान राहिलेले नाहीत. त्यामुळे हे सरकार शिक्षकांच्या समस्यांबाबत काहीही ऐकायला तयार नाही. राज्यातील विद्यमान शाळा मोडून काढणे व शिक्षकांना बदनाम करणे हा उद्योग शिक्षणमंत्री तावडे करीत आहेत. स्वयंअर्थसाह्य शाळांचे विधेयक आणले असून, आपल्या शाळा बंद करून आता कंपन्याना शाळा काढण्यास सरकार परवानगी देते आहे़  -कपिल पाटील,आमदार

टॅग्स :GovernmentसरकारMLAआमदार