शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लिलावासाठी बाजार समित्या सज्ज

By admin | Updated: June 9, 2017 01:08 IST

२४७ ट्रक भाजीपाला रवाना : आज व्यवहार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी सुकाणू समितीने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवत, त्यांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीत विक्रीसाठी माल आणण्याची मुभा दिल्यामुळे व्यवहारासाठी बाजार समित्या सज्ज झाल्या असून, सुकाणू समितीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर दूध व भाजीपाल्याची वाहतूक सुरळीत होऊन २४७ ट्रक रवाना करण्यात आले आहेत.१ जूनपासून शेतकरी संपावर गेल्यामुळे जिल्ह्यातील सतरा बाजार समित्यांचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाले. शेतकऱ्यांच्या संपामुळे महाग झालेला भाजीपाला स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शुक्रवारपासून व्यवहार सुरू होणार आहेत. गुरुवारी यासंदर्भात घोषणा होताच, जिल्ह्णातून ६८ दुधाचे टॅँकर, ६३ ट्रक भाजीपाला, ८३ ट्रक कांदा व ३३ ट्रक अन्य माल रवाना करण्यात आला तसेच दुपारनंतर घोटी, नाशिक, नांदगाव, मनमाड, चांदवड या पाच बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांनी माल आणल्याने त्याचे लिलाव करण्यात आले. एका बाजार समितीत एका दिवसात ४० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याने गेल्या आठ दिवसांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे संपामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या शेतमालाचीही तोडणी न झाल्याने खराब होऊन नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी सुकाणू समितीने शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीची अनुमती दिल्याने आता बाजार समितीत मालाची आवक होण्याची व लिलाव पार पडण्यास सुरुवात होणार आहे.