पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेमुळे अमावास्येला बाजार समिती कामकाज बंद असायचे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत घेतलेला हा निर्णय खूप आशादायी आहे. सर्व शेतकरीबांधवांना याचा चांगला फायदा होणार असल्याचे राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे यांनी सांगितले. बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय अवैज्ञानिक व खूप मोठी अंधश्रद्धा होती. इतर बाजार समितींनीही या निर्णयाचा अवलंब करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मालेगाव प्रधान सचिव रवींद्र अहिरे यांनी केली आहे. सेवा दलाचे रविराज सोनार, राजेंद्र दिघे, सारंग पाठक, नचिकेत कोळपकर, राजीव वडगे, स्वाती वाणी, प्रवीण वाणी, सुधीर काळुंके, अशोक पठाडे, अनिल महाजन, बळवंत अहिरे, मनोज चव्हाण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिलीप पाथरे आदींनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कोट....
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही अमावास्येला बाजार समितीचे लिलाव कामकाज सुरू करण्याबाबत विचाराधीन असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहे.
-संजय घोडके, संचालक, मालेगाव कृउबा