शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:10 IST

सासरच्या जाचाला कंटाळून बत्तीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथे घडली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी ८ जणांविरु द्ध हुंडाबळी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

सटाणा : सासरच्या जाचाला कंटाळून बत्तीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथे घडली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी ८ जणांविरु द्ध हुंडाबळी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.विवाहितेचा भाऊ नामदेव पांडुरंग सोळुंखे (रा. कोठरे, ता. मालेगाव) यांनी दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की दि. १० मार्च २००४ रोजी बहीण सुमित्रा हिचा विवाह अजमीर सौंदाणे येथील मुकुंद विजय पवार याच्याशी झाला होता. लग्नात माहेरच्यांनी केलेल्या सोन्याचे दागिने घेऊन ये यासाठी पती मुकुंद पवार, आजी सासू सुलाबाई पवार, चुलत दीर भाऊसाहेब पवार, नणंद मीनाबाई दीपक महाले, नंदई दीपक जगन्नाथ महाले (रा. रावळगाव), नणंद ज्योती मोरकर, नंदई गोकुळ मोरकर (दोघे राहणार कौतिकपाडे) यांनी संगनमत करून तगादा लावला होता. मात्र, सुमित्राने दागिने न दिल्याने तिचा शारीरिक छळ सुरु केला होता.या छळाला कंटाळून सुमित्राने अजमिर सौंदाणे येथील स्वत:च्या शेतात उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान सकाळी ७ वाजेच्या सुमारास सुमित्राचा मृतदेह विहीरीत तरंगतांना आढळून आला. सासरच्यांनी पोलिसांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह काढून येथील ग्रामीण रु ग्णालयात पाठविला. सुमित्राच्या माहेरच्या मंडळीने जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने ग्रामीण रु ग्णालयात गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी नातेवाइकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने फिर्यादीने दिलेल्या तक्र ारी वरून आठ जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या