नाशिक : जिल्हा कोषागार कार्यालयात ३१ मार्चला अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेची ६३ देयके सादर करून १०७ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातही रात्री उशिरा बजेट मॉनिटरिंग सिस्टीमला (बीडीएस) काही तांत्रिक अडचण आल्याने मंगळवारी उशिरापर्यंत निधी उपलब्धतेसाठी जिल्हा परिषदेसह सर्वच विभागांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र होते.यात सर्वाधिक निधी ग्रामपंचायत व बांधकाम विभागाला प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागनिहाय देयक व रकमांची संख्या पुढीलप्रमाणे- त्यापुढे योजना व कामांची माहिती- पशुसंवर्धन- २ देयके -४० लाख विविध योजनांसाठी व २ देयके- ४३ लाख ८८ हजार बांधकामांसाठी, ग्रामपंचायत- २ देयके- ७ कोटी ३ लाख मूलभूत सुविधा आणि ४ देयके- १० लाख ७ हजार ५९२ उपकराची रक्कम, २ देयके- ४७ लाख ८ हजार- वित्त विभाग परिभाषिक सेवानिवृत्ती अंशदान, ४ देयके- १४ कोटी ४ लाख २७ हजार १३ वा वित्त आयोग, बांधकाम- १७ देयके- ५० कोटी ५ लाख ८ हजार ८४ रस्ते व मोऱ्या, शिक्षण- २ देयके- ५ कोटी ६३ लाख ४ हजार- शालेय पोषण आहार, १ देयक-८० लाख- विविध योजना, १ देयक- १ कोटी ६० लाख-ई-लर्निंग, आरोग्य- ४ देयके- २ कोटी ५९ लाख ३६ हजार- विविध योजना, पाणीपुरवठा- १२ लाख ९६ हजार- विविध योजना, महिला व बालकल्याण-२ देयके- ४ कोटी ७६ लाख ७६ हजार- अंगणवाडी बांधकामे, १ देयक- ५० लाख- विविध योजना, ७ देयके- ४ कोटी ३४ लाख, ८१ हजार- आमदार निधी, ३ देयके- १ कोटी ४३ लाख ८७ हजार- डोंगरी विकास कार्यक्रम निधी, वित्त विभाग- ३ देयके- ४७ लाख हजार- परिभाषिक सेवा निवृत्ती अंशदान (डीसीपीएस), ४ देयके-१४ कोटी ४ लाख २७ हजार- १३ वा वित्त आयोग, लघुपाटबंधारे- १ देयक- १४ लाख ५७ हजार असे एकूण ६३ देयकांपोटी १०७ कोटी ९२ लाख १० हजार ६७६ रुपयांची उपलब्धतता झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
मार्चअखेरला शंभर कोटींचे ‘घबाड’
By admin | Updated: April 2, 2015 00:26 IST