भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चैताली म्युझिक मुंबईनिर्मित पार्श्वगायक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेला मराठी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.सावरकर जयंतीनिमित्त अभिनेते नागेश मोरवेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकला भेट देऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सावरकर जयंतीला शिवाजी चौकात पार्श्वगायक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिता करंजकर होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष एकनाथराव शेटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, माजी सहायक पोलीस आयुक्त राधाकृष्ण गामणे, नगरसेवक दीपक बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला सुरज गणोरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश हंबाडे, लेखाधिकारी प्रमोद जाधव, परभणी भूमी-भूमापन उपअधीक्षक किशोर गायकवाड, सेवानिवृत्त झालेले केशवराव कासार, अशोक मोजाड आदींचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समिती अध्यक्ष तानाजी करंजकर यांनी केली. सूत्रसंचालन प्रशांत कापसे व आभार प्रकाश सुराणा यांनी मानले .
भगूर येथे मराठी गीतांचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:30 IST
भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चैताली म्युझिक मुंबईनिर्मित पार्श्वगायक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेला मराठी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
भगूर येथे मराठी गीतांचा कार्यक्रम
ठळक मुद्देस्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकला भेट चैताली म्युझिक मुंबईनिर्मित पार्श्वगायन