शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अन्य बोर्डांच्या शाळेतही मराठीचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:37 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) व इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) या बोर्डाच्या अंतर्गत शहरात जवळपास ९० शाळा असून, या शाळांमधून आठवीपर्यंत मराठी विषय शिकविला जात असल्याचे समोर आले आहे.

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) व इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) या बोर्डाच्या अंतर्गत शहरात जवळपास ९० शाळा असून, या शाळांमधून आठवीपर्यंत मराठी विषय शिकविला जात असल्याचे समोर आले आहे. राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम शिकविला जाणार असला तरी राज्य शासनाच्या मान्यतेने या शाळा सुरू असल्यामुळे अशा शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे सक्तीचे आहे. त्याशिवाय या बोर्डाला संलग्नता मिळू शकत नाही. त्यानुसार अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत मराठी विषयाचे शिक्षण दिले जाते.शहरात राज्य मंडळाबरोबरच अन्य बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. राज्य मंडळाचा अभ्यासक्रमामध्ये मराठी विषय हा बंधनकारक आहेच, परंतु अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करताना मराठी विषय शिकविणेदेखील बंधनकारक असल्यामुळे इयत्ता आठवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. मराठी विषयासाठी स्वतंत्र शिक्षक आणि तासिका बंधनकारक असून, त्यावर त्यांची संलग्नता अवलंबून असल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अन्य बोर्डाच्या शाळा असल्या तरी त्यामध्ये मराठी अनिवार्य आहेच.अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम असलेल्या शहरात जवळपास ९० शाळा असून, त्यातील काही शाळांमधील मराठी तासिकाविषयी माहिती घेतली असता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मराठी विषय शिकविला जात असल्याचे समोर आले. नववी आणि दहावीसाठी फ्रेंच किंवा संस्कृत विषयांचा आॅप्शन देण्यात आला आहे. शहरातील इस्पालिअर स्कूल, ग्लोबल व्हिजन, रायन इंटरनॅशनल, रासबिहारी, अशोक युनिव्हर्सल, केंद्रीय विद्यालय, आदी शाळांचा प्रतिनिधिक आढावा घेतला असता त्यामध्ये मराठी तासिकाबरोबरच मराठी सण आणि मराठी भाषा दिनसारखे कार्यक्रमदेखील राबविले जातात.इतर बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे बंधनकारकच आहे. त्याशिवाय इतर बोर्डाला राज्य शासनाकडून संलग्नता मिळत नाही. इंग्रजी शाळांमध्ये आठवीपर्यंत मराठी शिकविले जात असल्यामुळे मराठी भाषेचा सन्मान राखला जातोच. महाराष्टÑातील मातीत रुजलेले विविध पारंपरिक सण, सोहळे इंग्रजी शााळेत मोठ्या उत्साहात होतात.- निवेदिता कमोद, प्रशासकीय व्यवस्थापक,रासबिहारी इंग्लिश मिडियम स्कूलबोर्ड कोणतेही असो इंग्रजी शाळेत मराठी शिकविणे हे बंधनकारकच आहे. मोठ्या शहरात अंमलबजावणी फारशी होत नाही. नाशिकपुरते बोलायचे झाल्यास नाशिक शहरातील इंग्रजी शाळांमध्ये हा नियम पाळला जातो असे ठामपणे सांगता येऊ शकते. इंग्रजी शाळा विषय आणि तासिका यांचे वेळापत्रक पाळताना दिसतात.- सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळा