नाशिक - मेन रोड येथील मराठा मंगल कार्यालयात अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकर्त्यांची रविवारी (दि.३१) माजी शहराध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी कोरोना काळात, तसेच गेल्या वर्षात निधन झालेल्या महासंघाचे कार्यकर्ते, समाजातील ज्येष्ठ नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर माजी शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी संघटनेच्या बांधणीबद्दल आणि कोरोनाकाळात संघटनेने केलेल्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी हरी निकम, ॲड. गिरीश बोरसे, अमोल निकम योगेश नाटकर अशोक कदम, अस्मिता देशमाने, शोभा सोनवणे, मीना पाटील आदी उपस्थित होते. अजय मराठे यांनी सूत्रसंचालन केले आणि अविनाश वाळुंजे यांनी आभार मानले.
(आरफोटो-३१ मराठा महासंघ) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.