शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

सरपंचपदाच्या आरक्षणामुळे अनेकांची होणार पंचाईत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:25 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे वगळता परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कालावधी कमी केल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत निघणार असल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्देइच्छुकांची कागदपत्रांची जुळवाजुळव : निवडणूकीची रणधुमाळी सुरू

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सहा महिने पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. कोणकोणाकडून उमेदवारी करू शकतो, याचे आडाखे बांधले जात असून, गावातील धनदांडग्यांना गळाला लावण्यासाठी गुप्त बैठका सुरू आहेत. त्यामुळे गावातील वातावरण आतापासून ढवळून निघाले असून, कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. आगामी काळात होणाऱ्या बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, स्टाइस, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. परिसरातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, तसेच दोडी, दापूर, मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ, सुरेगाव, खंबाळे, दातली, माळवाडी, दत्तनगर, चापडगाव, धुळवड, दोडी खुर्द, गोंदे, पाटोळे आदी गावात निवडणुकीचा धुराडा उडणार आहे.ऐन थंडीत गावगाडा तापणारऐन थंडीत नांदूरशिंगोटे परिसरात गावगाडा तापणार आहे. पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची तयारी सुरु केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने गावोगावचे पुढारी आता तयारीला लागले आहेत. गावातील प्रमुख नेतेमंडळीच्या पडद्याआडून हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सत्ताधारी व विरोधकांचे गट गावात सक्रिय झाले असून, त्यांनी गावातील संपर्क वाढविला आहे. काहींनी तर खर्च करण्यासही सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. पुढाऱ्यांच्या घरी राबता वाढला आहे.उत्सुकता शिगेलाग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक निकालानंतर काढले जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. तसेच यावेळी प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड होणार असल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील गावात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत