शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:21 IST

इगतपुरी : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत.

ठळक मुद्देकसारा घाटातही रस्त्याला रविवारी तडे पडल्याने या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इगतपुरी : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत.शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाउनची वाहतूक ठप्प झाली आहे. तर कसारा घाटातील जुना महामार्ग गेल्या आठवड्यापासून बंद असून नवीन कसारा घाटातून मुंबईला जाणारी व येणारी वाहतूक एकेरी मार्गाने संथ गतीने सुरू होती. नवीन कसारा घाटातही रस्त्याला रविवारी तडे पडल्याने या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असून, तालुक्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. यामुळे या सर्व धरणांतून हजारो क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याने गावांना जोडणारे बरेच पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्कतुटला आहे. इगतपुरी शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर दोन ते तीन फूट पाणी साठत असल्याने हे पाणी थेट नागरिकांच्या घरात व दुकानात घुसल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगावजवळ दोन ते तीन फूट दारणाकडे जाणारे पाणी थेट महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पाणी कमी झाल्यावर मुंबईला जाणारी वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली. तर नांदगावसदो, फांगुळगाव, पिंप्रीसदो आदी रस्त्यांवर पाणी आल्याने इगतपुरीत येण्यासाठी संपर्क तुटला होता.इगतपुरी शहरातील खालची पेठ परिसरात रात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे परिसरातील वीजपुरवठा बंद होता. शहरातील लोया रोडवरती सर्व नाले तुंबले होते.लोकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. कॉन्व्हेंट हायस्कूलजवळील एक भिंतही पडली आहे. जोग महाराज भजनी मठ येथे जाणाºया रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.जुन्या आग्रा रोडवरील गिरणारे गावाला जाणाºया रस्त्यावर कमरेएवढे पाणी साचले होते. मोठ्या वाहनचालकांना कसरत करावी लागली.दारणातून ३९२५० क्यूसेक पाण्याचा विसर्गनांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाने रविवारी सकाळपासून सर्वत्र हाहाकार करायला सुरु वात केली असून, गेल्या २४ तासांत विक्र मी २२२ मिमी. पावसाची नोंद झाली. रविवारी एकूण ९८.३९ टक्के पाऊस पडला आहे. सकाळपासून तर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दारणा धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या धरणातून दारणा धरण भरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जलसंपदा विभागाने रविवारी सकाळी नऊ वाजता विसर्ग सुरू केला. यंदाच्या पावसाळ्यात दारणातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला असून, सकाळी नऊ वाजेपासून सुमारे ३९२५० विक्र मी क्यूसेक प्रतिवेगाने पाणी नांदूरमधमेश्वरकडे निघालेले आहे.च्शहरातील रविवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट होता. बाजारातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने दुकानांचे हाल झाले होते. धुवाधार पाऊस पडत असल्याने ग्राहकांनी बाजारात येण्याचे टाळले, यामुळे बाजारपेठ मंदावली होती.