शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रूंदीकरणाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:13 IST

नांदगाव-साकोरा रस्ता रूंदीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून कासवगतीने सुरू असून, सदर कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र त्याअगोदर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही निंबाच्या झाडांची रस्ता रूंदीकरणाला कुठलीही अडचण नसतांना कत्तल केल्याने परिसरातील वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देसाकोरा रस्त्यावरील प्रकार : वृक्षप्रेमी संतप्त

साकोरा : नांदगाव-साकोरा रस्ता रूंदीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून कासवगतीने सुरू असून, सदर कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र त्याअगोदर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही निंबाच्या झाडांची रस्ता रूंदीकरणाला कुठलीही अडचण नसतांना कत्तल केल्याने परिसरातील वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.पावसाळ्याच्या दिवसांत याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोरखडी बंधाऱ्यानजिक रस्त्याची दुरावस्था झाली होती. यासंदर्भात दुरु स्तीसाठी वाहनचालकांनी अनेकदा मागणी केली होती.त्यानंतर शिवमळा वस्तीपासून साकोरा गावापर्यंत तीन किलोमीटर रस्ता रूंदीकरणाला आणि दुरूस्तीसाठी मंजुरी मिळाली. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील एकाच घरांतील दोन ठेकेदारांना हे काम दिले असल्याचे समजते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन मीटर रूंदीकरणाचे काम सुरू करण्यासाठी या विभागाने नांदगाव मधील एका व्यक्तीला झाडे तोडण्याचे आदेश दिले. या रस्त्यालगत गेल्या कित्येक वर्षांपासून उभ्या असलेल्या निंबाच्या अनेक झाडांची कुठलीही अडचण नसतांना ती तोडल्याने रस्ता बोडखा झाला आहे. त्यामुळे आता तप्त उन्हाळ्यात सावली देणाºया या झाडांची उणीव वाटसरूंना भासत आहे. विशेष म्हणजे काही शेतक-यांच्या बांधावरील झाडे देखील तोडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सदर रस्त्यांचे काम ठेकेदाराने अगदी संथपणे सुरू केले असून, सध्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याचे पाहून त्यांच्या मर्जीनुसार पाण्याचा वापर न करता साईडपट्टी खोदल्या व त्यावर अत्यल्प प्रमाणात डांबराचा वापर करून काम उरकण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे सदर रस्ता किती दिवस चांगला राहील याबाबत परिसरातून शंका व्यक्त केली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोरखडी बंधा-यानजिक दोन्ही बाजूला तसेच रस्त्यावर पाणी वाहत असल्याने या ठिकाणी दोन मोठे पाईप टाकणे गरजेचे असतांना देखील सदर काम तसेच सुरू आहे. रस्ता रूंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर देखील वाहनचालकांना रस्त्यावर वाहणाºया पाण्यातून कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने काम पूर्ण होण्याच्या अगोदर याठिकाणी मोरीचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा