शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे, सामनगाव झोपडपट्टी भागात अनेक समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:06 IST

येथील एकलहरे व सामनगाव झोपडपट्टीत अनेक समस्या आहेत. या दोन्हीही झोपडपट्ट्यांमध्ये ग्रामपंचायतींनी सोयी-सुविधा पुरविल्या असल्या तरी काही ठिकाणी अस्वच्छ गटारी, गलिच्छपणा, सांडपाण्याचा निचरा, अंतर्गत रस्ते, भटक्या कुत्र्यांचा त्रास, बेशिस्त वाहतूक अशा अनेक समस्या आहेत.

एकलहरे : येथील एकलहरे व सामनगाव झोपडपट्टीत अनेक समस्या आहेत. या दोन्हीही झोपडपट्ट्यांमध्ये ग्रामपंचायतींनी सोयी-सुविधा पुरविल्या असल्या तरी काही ठिकाणी अस्वच्छ गटारी, गलिच्छपणा, सांडपाण्याचा निचरा, अंतर्गत रस्ते, भटक्या कुत्र्यांचा त्रास, बेशिस्त वाहतूक अशा अनेक समस्या आहेत.एकलहरे वीज केंद्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे पोट भरण्यासाठी नागरिकांंचे लोंढे आले. कालांतराने येथील पाटबंधारे खात्याच्या जागेवर झोपड्या बांधून स्थिरावले. काही नागरिक महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातूनही आले. येथे शेतीची कामे, बिगारी कामे, ठेकेदारी कामगार म्हणून उदरनिर्वाह करू लागले. हळूहळू संख्या वाढत जाऊन आजमितीस चार ते पाच हजार लोकसंख्या झाली. पाटाच्या उत्तरेकडील झोपडपट्टी एकलहरे ग्रामपंचायत हद्दीत तर पाटाच्या दक्षिणेकडील झोपडपट्टी सामनगाव ग्रामपंचायत हद्दीत नोंद झाली. त्यामुळे येथील नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, गटारी, आरोग्य, स्वच्छतागृहे या मूलभूत सुविधा दोन्ही ग्रामपंचायतींनी पुरविल्या आहेत. एकलहरे ग्रामपंचायत हद्दीतील झोपडपट्टीचा प्रभाग एक झाला, तर सामनगाव झोपडपट्टीला मळे विभागाचा काही भाग जोडून प्रभाग क्र मांक चार झाला आहे.येथील सरपंच मोहिनी जाधव या विभागाच्या सरपंच आहेत. त्यामुळे झोपडपट्टीच्या भुयारी गटार योजना, नळपाणीपुरवठा योजना मार्गी लागल्या आहेत. आरोग्य सेवेसाठी या भागातील नागरिकांना अनेक अडचणी येतात. म्हणून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, अशी मागणी येथील माजी सरपंच राजाराम धनवटे, सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, सामनगावचे उपसरपंच सचिन जगताप यांनी वारंवार केली आहे.सर्वसामान्य नागरिकांना गुंडांचा त्रासदोन्हीही झोपडपट्ट्यांमध्ये ग्रामपंचायतींनी सोयी-सुविधा पुरविल्या असल्या तरी काही ठिकाणी अस्वच्छ गटारी, त्यातून डुकरांचे वास्तव्य, गलिच्छपणा, सांडपाण्याचा निचरा, अंतर्गत रस्ते, भटक्या श्वानांचा त्रास, बेशिस्त वाहतूक, रस्त्यावरच उभ्या राहणाºया राखेच्या गाड्या, रस्त्याच्या चौकातून उभे राहणारे टवाळखोर, अवैध धंदे, देशी दारूच्या विक्र ीचे व्यवसाय, राजरोसपणे चाकू-सुरे घेऊन होणाºया हाणामाºया या सर्वांचा त्रास येथील व्यवसाय करणारे व्यावसायिक व गोरगरीब नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे अवैध व्यवसाय व गुंडगिरीची समस्या सोडविणे गरजेचे आहे, अशी येथील महिलांची प्रतिक्रि या आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक