शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

येवल्यात अनेक अधिकारी गैरहजर

By admin | Updated: March 31, 2017 00:02 IST

येवला : येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो

 येवला : येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. बुधवारी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्टिंग आॅपरेशन केले असता कार्यालयातील जवळपास अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या खुर्च्या रिकाम्या असल्याचे आढळून आल्याने, गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या दिवसाची बिनपगारी रजा करण्याची मागणी मोहन शेलार यांनी केली आहे.येवला पंचायत समितीमधील काही अधिकारी व कर्मचारी बाहेरगावाहून ये-जा करीत असल्याने त्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी उशीर होतो. काही कर्मचारी मनमानी पद्धतीने दांडी मारतात. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना, लाभार्थींना ताटकळत बसावे लागते. यासंदर्भात पंचायत समिती सदस्यांकडे अनेकांनी तक्रारी केल्याने बुधवारी स्टिंग आॅपरेशन केले असता सर्व कार्यालयच खाली आढळून आले.पंचायत समिती कर्मचारीवर्गाची कार्यालयीन वेळ तशी सकाळी १० ते ५ असते. मात्र १२ वाजेपर्यंत काम करण्याचा मुहूर्त मिळत नाही. ग्रामीण भागातून येणारे लोक सकाळी १० पासून पंचायत समितीत कर्मचाऱ्यांची वाट पाहत असल्याचे विदारक चित्र येवला पंचायत समितीत पाहायला मिळते. सकाळी ११ वाजता सदस्य मोहन शेलार यांनी अचानक भेट देऊन हजेरी रजिस्टर व हालचाल रजिस्टर तपासले असता कर्मचारीवर्गाची चांगलीच धांदल उडाली. शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी हजर होते. मात्र विस्तार अधिकारी यांनी हालचाल रजिस्टरमध्ये २७ तारखेला सायंकाळीच नोंद करून २९ तारखेला शाळा भेटीसाठी जाणार असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्ष शाळेवर मात्र संबंधित विस्तार अधिकारी गेलेले नसल्याचे शेलार यांनी सांगितले. आरोग्य विभागात आरोग्य अधिकारीच कार्यालयात हजर नव्हते. चौकशी केली असता आरोग्य अधिकारी नाईकवाडी यांच्याकडे अंदरसूल आरोग्य केंद्राचा चार्ज असल्याने ते अंदरसूलला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अंदरसूल आरोग्य केंद्रात फोन करून चौकशी केली असता तेथे फोन उचलायलाच कोणी उपस्थित नसल्याचे लक्षात आले. तेथील कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून विचारले असता आरोग्याधिकारी नाईकवाडी अंदरसूल आरोग्य केंद्रातही उपस्थित नसल्याची माहिती मिळाली. अशीच परिस्थिती पशुसंवर्धन विभागात आढळली. संपूर्ण पशुसंवर्धन कक्ष रिकामा होता. वित्त विभागातही केवळ एकच कर्मचारी हजर होता. (वार्ताहर)