शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ग्रामपंचायती ध्वजस्तंभाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:18 IST

नांदगाव : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला काही ग्रामपंचायतीकडे अद्याप ध्वजस्तंभच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने स्वातंत्र्याच्या सात दशकात ध्वजारोहणाचे कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांनी गावातल्या शाळेच्या ध्वजस्तंभावर केले असल्याची माहिती उद्विग्न करणारी ठरली आहे.

ठळक मुद्देनांदगाव तालुका : शाळेतच होते ध्वजारोहण

नांदगाव : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला काही ग्रामपंचायतीकडे अद्याप ध्वजस्तंभच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने स्वातंत्र्याच्या सात दशकात ध्वजारोहणाचे कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांनी गावातल्या शाळेच्या ध्वजस्तंभावर केले असल्याची माहिती उद्विग्न करणारी ठरली आहे.एरव्ही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्याचा दंडक असताना शाळेच्या ध्वजस्तंभावर आपल्या हातून झेंडावंदन करवून घेण्याचा सरपंचांचा अट्टाहास व त्यातून उडालेले खटके शिक्षक मंडळीनी अनुभवले आहेत. पळाशी गावात दोन दिवसांपूर्वी ध्वजस्तंभ उभारला असल्याची माहिती आहे. तर अद्यापही काही गावांत ध्वजस्तंभ उभारणीच्या प्रतीक्षेत आहेत. ध्वजसंहितेनुसार राष्ट्रीय ध्वजारोहणाचे सर्वसामान्य निकष पाळण्यात कुठे कुचराई झाली तर त्याबाबतीत कायदेशीर कारवाईचा सोपस्कार केला जातो. झेंडा फडकविण्यावरून यापूर्वी मानापमानाचे प्रकार घडलेले आहेत.ग्रामविकास यंत्रणेची अनास्थासरपंचाने झेंडा फडकवावा अशी अपेक्षा करणाऱ्या गावपुढाऱ्यांना गावात मात्र हाच ध्वज उभारण्यासाठी साधा ध्वज स्तंभ उभारता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार असूनही त्याबाबत ग्रामविकास यंत्रणा अनास्थेने बघत असल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार दिसून येत आहे. माळेगाव व एकवई या दोन गावांत ग्रामपंचायत कार्यालयाकडे ध्वजारोहणासाठी स्तंभ नसल्याची माहिती तालुका पंचायत समितीचे ग्रामविकास विभागाचे विस्तार अधिकारी ढवळे यांनी दिली

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNew Yearनववर्ष