शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे तब्बल १३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:50 IST

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) तब्बल १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांत शहरातील नऊ, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे बळींची संख्या २६२वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरातत तब्बल २९५ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. 

ठळक मुद्देसंकट वाढले : दिवसभरात २९५ नवे बाधित

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) तब्बल १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांत शहरातील नऊ, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे बळींची संख्या २६२वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरातत तब्बल २९५ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. महानगरात शुक्रवारी १८९ बाधित आढळून आले. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या ९१वर पोहोचल्याने एकूण बाधितांचा आकडा थेट ४८६४वर पोहोचला आहे. महानगरात पुन्हा एकदा बाधितांच्या आकड्याने दोनशेनजीकचा पल्ला गाठला. गत महिनाभरात महानगरातील बाधितांचा आकडा शंभरीपार पोहोचण्याची ही बारावी वेळ आहे. महानगरातील नऊ बाधितांव्यतिरिक्त चार मृतांमध्ये दोन व्यक्ती मालेगावच्या आहे. पेठ, धुळ्याच्या महिलेचा देखील त्यात समावेश आहे. शुक्रवारी मनपा रुग्णालयांमध्ये ४१८, तर ग्रामीणला १७८, जिल्हा रुग्णालयात १९, मेडिकल कॉलेजला ६, मालेगाव ११, तर गृहविलगीकरण कक्षात मिळून ६५० नवीन रुग्ण दाखल झाले.पेठमध्ये दोन रुग्ण बाधित आढळून आल्याने जिल्ह्यात आता एकमेव सुरगाणा तालुका कोरोनामुक्त उरला आहे. पेठमध्ये आढळून आलेल्या दोन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील ११५ जणांच्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिंडोरी तालुक्यात गुरुवारी १४  अहवालापैकी वरखेडा येथील महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.ओझर शहरात  शुक्र वारी (दि.३) दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने चिंता व्यक्त होत आहे.लासलगाव येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या चार झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या