शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन टूल्स कंपनीत मनसे युनियनचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:39 IST

येथील इंडियन टूल्स कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मनसे युनियनचा झेंडा लावताच कंपनी व्यवस्थापनाने नमते घेत युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. मुंबईच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन कंत्राटी कामगारांना देण्यात आले आहे.

सातपूर : येथील इंडियन टूल्स कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मनसे युनियनचा झेंडा लावताच कंपनी व्यवस्थापनाने नमते घेत युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. मुंबईच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन कंत्राटी कामगारांना देण्यात आले आहे. इंडियन टूल्स कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाºया सुमारे सव्वा दोनशे कामगारांनी वेतनवाढीच्या कराराचा आर्थिक लाभ मिळावा, नियमाप्रमाणे किमान वेतन मिळावे, नियमाप्रमाणे ओव्हर टाइमचा लाभ मिळावा, व्यवस्थापनाने कमी केलेल्या सहा कामगारांना कामावर घेण्यात यावे, १० ते १२ वर्षांपासून ठेकेदारीवर काम करणाºया कामगारांना कायम करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी २२० कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या कामगारांनी शुक्र वारी मनसेची युनियन स्थापन करून प्रवेशद्वारावर मनसे युनियनच्या फलकाचे अनावरण केले. यावेळी युनियनचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, चिटणीस अंकुश पवार, कैलास मोरे, विजय अहिरे, मनोज बोराडे, राहुल ढिकले उपस्थित होते.  कंत्राटी कामगारांनी मनसेचा झेंडा लावताच कंपनी व्यवस्थापनाने युनियनच्या पदाधिकाºयांना चर्चेसाठी पाचारण केले. कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाबाबत सोमवारी मुंबईत जाऊन वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन एचआर विभागाचे उपाध्यक्ष मेजर रमेश शिराढोणकर यांनी दिल्याचे कामगारांनी सांगितले.

टॅग्स :Employeeकर्मचारी