शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उमराळे बुद्रुक येथे मनोरुग्ण मुलाने केला वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 01:00 IST

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील मनोरुग्ण मुलाने आपल्या वडिलांचा खून केला असून, खून केल्यानंतर त्याने स्वत:ला मारहाण करून घेतली त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे आई व भावजय योगीता पवार यांनाही मारहाण केली.

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील मनोरुग्ण मुलाने आपल्या वडिलांचा खून केला असून, खून केल्यानंतर त्याने स्वत:ला मारहाण करून घेतली त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.उमराळे बुद्रुक येथील मयत रमेश नामदेव पवार (५०) यांचे कुटुंब चाचडगाव येथील राहुल चव्हाण यांच्या शेतात शेतमजुरी म्हणून काम करतात. त्यांच्या कुटुंबातील सागर रमेश पवार (२७) हा मोठा मुलगा मनोरुग्ण असल्याने त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; परंतु तो औषधे घेत नव्हता, त्याऐवजी बुवाबाबाकडे जात होता. तो आपल्या घरातील आई, वडील, भावजय यांना मारहाण करीत असे. गुरुवारी (दि.११) रात्री ८.३० वाजता सागर पवार या मनोरु ग्ण मुलाने आपले वडील रमेश नामदेव पवार यांना मारहाण सुरू केली. लाकडी दांड्याने डोक्यात जबर मारहाण केल्याने रमेश नामदेव पवार हे गतप्राण झाले. त्याचसोबत आई व भावजय योगीता पवार यांनाही मारहाण केली.याबत आरोपीच्या भावजई योगीता समीर पवार (२०) यांनी दिंडोरी पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे. याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी रमेश पवार हा जखमी असल्याने नाशिक रु ग्णालयात उपचार घेत आहे.