शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

मनोहर पर्रीकर : १५० वे ‘सुखोई-30’ भारतीय हवाईदलात सामील

By admin | Updated: January 9, 2015 23:54 IST

शेजारील शत्रुराष्ट्रांमुळेच भारत शस्त्रसज्ज

नाशिक : भारत हे शांतताप्रिय राष्ट्र आहे, तथापि, शेजारील काही शत्रुराष्ट्रांमुळे भारताला शस्त्रसज्ज राहावे लागत आहे. त्यामुळे अशा मित्रत्व न बाळगणाऱ्या राष्ट्रांमुळेच शस्त्रांस्त्रांची गरज कायम राहणार आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएलच्या) ओझर येथील कारखान्यात सुखोई या लढावू विमानांच्या निर्मितीचा पहिला १५० विमान निर्मितीचा टप्पा पार पडला. त्याचवेळी विशिष्ट कालावधीनंतर सुखोई विमानांची देखभाल दुरुस्तीसह पुनर्बांधणी करून ते पुन्हा हवाईदलाला सुपूर्द करण्याचा सोहळा शुक्रवारी ओझर येथे पार पडला. यावेळी संरक्षणमंत्री पर्रीकर बोलत होते. हवाई दलप्रमुख अरूप रहा, एचएएलचे अध्यक्ष डॉ. आर. के. त्यागी, सह संचालक के. के. पंत तसेच दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, निफाडचे आमदार अनिल कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.अत्यंत उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कर्मचारी वृंद असल्याचे सांगून पर्रीकर यांनी एचएलमधील अधिकारी आणि कर्मचारी वृंदांचे कौतुक केले. आपण एका कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगून पर्रीकर यांनी यापुढे सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.भारतीय हवाई दल एचएएलवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे दोन्ही परस्परावर अवलंबून असल्याचे ते म्हणाले.एचएएलचे अध्यक्ष डॉ. त्यागी यांनी पुनर्बांधणी केलेले दुसरे सुखोई विमान हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यासाठी सज्ज होत आहे, असे सांगितले. (पान ४ वर)सुखोईची निर्मिती आणि पुनर्बांधणीची एचएएलमध्ये एका छताखाली सोय करण्यात येणार असून, त्यासंदर्भात क्षमता वाढीसाठी एचएएलच सज्ज असल्याचे सांगितले. नाशिक, कोरापत, लखनौ, कोरवा आणि हैदराबाद यांचा सुखोईच्या निर्मिती आणि पुनर्बांधणीत सहभाग आहे. सुखोईचा पुनर्बांधणी करण्यासाठी नाशिकमधील कारखाना जगातील एक महत्त्वाचा कारखाना आहे. त्याशिवाय दहा देशांत अशा प्रकारची सेवा देण्याची क्षमता येथे असल्याचे ते म्हणाले. यावेळी सुखोई-३० एमकेआय, एसबी०२७ तसेच नव्याने निर्मित केलेले १५० वे सुखाई ३० एमकेआय हे लढावू विमान संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते हवाई दलाला सुपूर्द करण्यात आले. यावेळी एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक एस. सुब्रमण्यम् यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)