शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

मनमाडच्या सत्तारूढ नगरसेवकांचीच ‘दांडी’

By admin | Updated: June 12, 2014 00:44 IST

नगरसेवक अनुपस्थित राहिंल्याने कोरमअभावी आजची सभा रद्द करण्यात आली.

 

गिरीश जोशी

मनमाडबहुचर्चित नवीन इमारतीतील नगरपालिका कार्यालय शहरातील जुन्या इमारतीमध्ये आणण्याबरोबरच वाढीव पाणीपट्टी दरवाढ स्थगित करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेला सत्तारूढ गटाचे एकमेव नगरसेवकवगळता अन्य सर्व सत्तारूढ नगरसेवक अनुपस्थित राहिंल्याने कोरमअभावी आजची सभा रद्द करण्यात आली.जनतेच्या जिव्हाळ्याच्या पाणीपट्टीच्या प्रश्नावर गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांनी जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत विरोेधक नगरसेवकांनी सभात्याग केला. शहरातील नगरपालिकेचे कार्यालय शहराबाहेर आययूडीपी भागात स्थलांतरित करण्यात आले असल्याने नागरिकांना किरकोळ कामासाठी पालिकेत जाण्याकरिता रिक्षा भाड्याचा भुर्दंड सोसावा लागतो. या ठिकाणी नागरिकांना कामासाठी चकरा माराव्या लागतात. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. हे कार्यालय शहरातील जुन्या इमारतीमध्ये पुन्हा स्थलांतरित करावे यासह २० दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात असताना पाणीपट्टीत करण्यात आलेली शंभर रुपयांची दरवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करत शिवसेनेचे गटनेते संतोष बळीद यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर ठराव मांडून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.या विषयावर आज नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली सर्र्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात हजर झाले असले तरी सभेचा सुरू होण्याचा कालावधी उलटूनही रवींद्र घोडेस्वार हे एकमेव नगरसेवकवगळता सत्तारूढ गटाचे एकही नगरसेवक सभागृहात उपस्थित नव्हते. कोरमअभावी सदरची सभा स्थगित करण्यात आली असल्याचे नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी सांगितले. पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर नगरसेवकांनी अनुपस्थित राहून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.