मनमाड : शहरात मुधवारी (दि.२९) सायंकाळी आलेल्या अहवालात पुन्हा २१ अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आले असून एक जनाचा मृत्यू झाल्याने नागरीकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे.शहराच्या सर्वच भागांत आता झपाट्याने कोरोनाचा फैलाव होऊ लागल्याचे चित्र आहे. गेल्या ४ दिवसापासून मनमाडचे ८६ अहवाल प्रलंबित होते ते सर्व अहवाल मुधवारी सायंकाळी प्राप्त झाले.येथील पॉझिटिव्ह रु ग्णाची संख्या आता २११ पर्यंत गेली आहे. त्यापैकी १४१ रु ग्ण बरे झाले आहेत. तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ६४ पॉझिटिव्ह रु ग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहे. शहरात २२ कंटेन्मेंट झोन असून त्यात विविध निर्बंध सुरू आहेत. दरम्यान मनमाड नगरपालिकेत बुधवारी २ कामगार पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण इमारतीचे सॅनिटायझेशन करण्यात आले.
मनमाडला कोरोनाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:53 IST
मनमाड : शहरात मुधवारी (दि.२९) सायंकाळी आलेल्या अहवालात पुन्हा २१ अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आले असून एक जनाचा मृत्यू झाल्याने नागरीकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे.
मनमाडला कोरोनाचा कहर
ठळक मुद्देनव्याने २१ पॉझिटीव्ह : एक इसमाचा मृत्यू