शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मनमाड-येवला-कोपरगाव रस्त्याची चाळणी

By namdeo kumbhar | Updated: November 21, 2019 16:05 IST

येवला: मनमाड-येवला-कोपरगाव रस्त्याची चाळणी झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच रस्त्यावरून चांदवड व मालेगाव या मार्गावरून येणारी सगळी अवजड वाहनांची वाहतूक याच मार्गाने येवला व मनमाड शहरातून जाते.यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात.

ठळक मुद्देहे अपघात टाळण्यासाठी चांदवड व मालेगाव कडून येणारी अवजड वाहतूक नांदगाव मार्गे वळवावी अशी मागणी येवलेकरांनी केली आहे. डॉ.अरविंद अंतुर्लीकर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कयेवला:मनमाड-येवला-कोपरगाव रस्त्याची चाळणी झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच रस्त्यावरून चांदवड व मालेगाव या मार्गावरून येणारी सगळी अवजड वाहनांची वाहतूक याच मार्गाने येवला व मनमाड शहरातून जाते.यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी चांदवड व मालेगाव कडून येणारी अवजड वाहतूक नांदगाव मार्गे वळवावी अशी मागणी येवलेकरांनी केली आहे. डॉ.अरविंद अंतुर्लीकर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.येवल्यातील सर्व शाळांचे प्रतिनिधी तसेच येथील आनंद शिंदे, बाळासाहेब मांजरे, समीर देशमुख, प्रीतम पटणी यांनी या संबंधाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की मालेगाव व चांदवड मार्गे येणाº्या अवजड वाहनांस मनमाड व येवला शहरांमधून नगर-शिर्डी मार्गे जाण्यास प्रतिबंध करावा. मालेगाव मनमाड मार्गे अहमदनगर ला जाणाº्या अवजड वाहनांस प्रतिबंध करावा. पांजर नदीवरील मनमाड शहरातील चांदवड चौफुलीजवळील सध्या सुरू असलेला आर.सी.सी चा पुल अरु ंद व कुमकुवत आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.नगर - मनमाड राज्य महामार्ग हा येवला व मनमाड शहरातून गेलेला आहे.त्या महामार्गाला लागून दोन्ही बाजूस शाळा,कॉलेज असल्याने महामार्गावरील वरील वाहनांचा विद्यार्थ्यांना व शहरातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनमाड व येवला शहरातील नागरिक व तसेच विद्यार्थ्यांना प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.व कित्येकदा अपघातही झाले आहेत.या रस्त्यावर धावणाº्या अवजड वाहनांमुळे अनेकांचे अपघातात जीव गेले आहे.अशा वाहनांना मनमाड-नांदगाव मार्गे औरंगाबाद बाजूस वळविण्यात यावे.अशी मागणी केली आहे..या अवजड वाहनांना मनमाड व येवला मार्गे येण्यास प्रतिबंध करून नांदगाव मार्गे वळवल्याने विद्यार्थ्यांचे व शहरातील नागरिकांचे होणारे अपघात टाळता येतील असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनाच्या प्रति शहर वाहतूक कक्ष प्रमुख, शहर वाहतूक नियंत्रण कक्ष मनमाड व येवला, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मनमाड व येवला तहसील कार्यालय येवला यांना देण्यात आल्या आहेत.