मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाºया डॉक्टर व कर्मचाºयांना संतप्त कर्मचाºयांनी रुग्णालयातच कोंडले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांची सुटका झाली. या वेळी रुग्णालय प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. येथील एक महिला आजारी असल्याने तिला रु ग्णालयात दाखल करून घ्यावे यासाठी काही महिला रुग्णालयात गेल्या. परंतु डॉक्टरांनी बराच वेळ दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. हा प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेऊन सर्व प्रकार मुख्य अधीक्षकांच्या कानावर टाकण्यासाठी गेले. मुख्य डॉक्टर नरवणे हेच गैरहजर असल्याचे उघड झाले. यावेळी उपस्थित कर्मचाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त नागरिकांनी डॉक्टर व कर्मचाºयास रुग्णालयातच कोंडून ठेवले. यावेळी अकबर शाह, वासिम शाह, अल्ताफ शाह, मोहसीन शेख, लाला पटेल, बुढन शेख, हसद डावरे, मिलिंद शेळके, अयूब पठाण, बाळा शेळके व इतर नागरिक व महिला उपस्थित होत्या.
मनमाड : प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी कर्मचाºयांना कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:52 IST
मनमाड : रुग्णालयात आलेल्या महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाºया डॉक्टर व कर्मचाºयांना संतप्त कर्मचाºयांनी कोंडले.
मनमाड : प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी कर्मचाºयांना कोंडले
ठळक मुद्देदाखल करून घेण्यास टाळाटाळ उडवाउडवीची उत्तरे