मनमाड : येथील शीख धर्मीयांचे पवित्र श्रध्दास्थान असलेल्या गुरुद्वारात सालाना जोडमेला आणि श्री गुरुगादी स्मृतिदिन वार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाभरातील शीखबांधवांनी गुरुद्वारामध्ये हजेरी लाऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.यानिमित्त मनमाड गुरुद्वारावर आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होतीे. विश्वशांतीसाठी तीन दिवस सुरू असलेल्या अखंड पाठाची सांगता करण्यात आली. वर्षभरातील सर्वात मोठ्या सोहळ्यात भजन, कीर्तन वाहेगुरू का लंगर (महाप्रसाद), गुरुदागद्दी ग्रंथसाहेबाची शहरातून काढण्यात आलेली मिरवणूक यासह अन्य धार्मिक कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घेतला. संत बाबा नरेंद्रसिंघजी (कारसेवावाले) व संत बाबा बलबिंदरसिंघजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. मनमाड शहर व परिसरातील सर्वधर्मीय बांधवानी या वेळी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. उपस्थित भक्तांचे स्वागत गुरुद्वारा प्रबंधक बाबा फौजासिंघजी यांनी केले.(वार्ताहर)
मनमाड : गुरुगादी स्मृतिदिन सोहळा
By admin | Updated: December 23, 2014 00:15 IST