शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मनमाड : गौराई महिला मंडळाकडून आठवणीतील खेळांना उजाळा...

By admin | Updated: August 8, 2014 00:51 IST

मनमाड : गौराई महिला मंडळाकडून आठवणीतील खेळांना उजाळा...

‘खेळ मंगळागौरीचे’, जतन संस्कृतीचे !मनमाड : सध्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात पारंपरिक लोकोत्सव लोप पावत असले तरी, येथील गौराई महिला मंडळाच्या महिलांनी ‘खेळ मंगळागौरीचे’ या कार्यक्रमातून काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या आठवणीतील खेळांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.सध्या श्रावण महिंना सुरू असून, व्रतवैकल्याच्या या महिन्यात महिलावर्गाची धावपळ सुरू आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी श्रावण महिन्यातील दर मंगळवारी मंगळागैरीच्या पूजनाची गरबड सर्वत्र दिसून येते. या पूजनाचे विशेष आकर्षण म्हणजे मंगळागौरीचे खेळ होत. श्रावण महिन्याचे औचित्य साधून मनमाड येथील गौराई मंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या ‘खेळ मंगळागौरी’चे या कार्यक्रमात सासू-सुनेच्या नात्यामधील घट्ट वीण दर्शवतानाच स्त्रीभ्रूणहत्त्येसारख्या अन्य सामाजिक विषयाला हात घालून संस्कृती जोपासण्यास हातभार लावला आहे. मंगळागौर, गणेशोत्सव तसेच नवरात्रामध्ये या कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येते.गणेशवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते. त्यानंतर घरगुती वातावरणाची पार्श्वभूमी असलेली गाणी सादर केली जातात. किस बाई किस। दोडका किस।दोडक्याची फोड। लागली गोड।आणीक तोड बाई आणीक तोड।आठूड केलं । गाठूड केलं।सासूच्या भ्यान सांधिला ठेवलं।आता कस करू बाई घुशीन नेलं।अशा प्रकारे सासू-सुनेच्या नात्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या गाण्यांमधून मनोरंजन करण्यात येते.लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या ।मामाने दिल्या मला ।सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या ।या गाण्यांमधून माहेरच्या नातेवाइकांप्रति असलेली स्रेहभावना दिसून येते. यावेळी गाण्यांबरोबरच लंगडी, फुगडी, होडी, जाळी, गोफ, गाठोडे अशा विविध खेळांनी कार्यक्रमाला रंगत आणली जाते. जुन्या गाण्यांना उजाळा देतानाच वयात आलेली मुलगी पहाण्याच्या कार्यक्रमाचे वर्णन करताना महिला म्हणतात -तिखटमीठ मसालाफोडणीचे पोहे कशाला।पाहुणे बघण्याच्या कार्यक्रमालायाबरोबरच अन्य सामाजिक विषयांवर कार्यक्रमातून जनजागृती करण्यात येत आहे. गौराई मंडळाच्या महिलांनी सदरचा उपक्रम राबवून आठवणीतल्या खेळांना उजाळा दिला आहे. शहरासह परिसरात सादर करण्यात येणाऱ्या या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे संयोजन जयश्री माणके या करत असून, नीलिमा धारवाडकर, गौरी अडावदकर, वैष्णवी पुरंदरे, संपदा भावे, मीनाक्षी बेंद्रे, जयश्री माणके, मोहिनी माणके, सीमा कुलकर्णी, प्रणिती चंद्रात्रे, कृपा दिंडोरकर, स्मिता कानिटकर, वृंदा शेटे, श्रावणी पुरंदरे, शलाका माणके, सई बेंद्रे यांच्यासह मंडळाच्या अन्य सदस्यांच्या सहभागातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. विकास काकडे यांनी पल्लवी मंगल कार्यालयत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित मान्यवर हरखून गेले. यावेळी डॉ. शांताराम कातकाडे, डॉ. विद्याधर मालते, आबासाहेब दिंंडोरकर, गणेश गरुड, हेमंत वाले, मीरा मालते, विनया काकडे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)