शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा ऐवज वाटपावरून मनमाडला गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:47 IST

मनमाड : धुळे येथील डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींमध्ये आपापसात चोरीचा ऐवज वाटपातून झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मनमाड शहरातील भगतसिंग मैदानात घडली. भल्या पहाटे घडलेल्या या थरार नाट्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. जखमी आरोपींचा जबाब घेण्यासाठी मनमाड येथील पोलीस पथक धुळे येथे रवाना झाले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मनमाड : धुळे येथील डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींमध्ये आपापसात चोरीचा ऐवज वाटपातून झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मनमाड शहरातील भगतसिंग मैदानात घडली. भल्या पहाटे घडलेल्या या थरार नाट्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. जखमी आरोपींचा जबाब घेण्यासाठी मनमाड येथील पोलीस पथक धुळे येथे रवाना झाले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.मनमाड येथील भगतसिंग मैदान परिसरात राहणारे सागर मरसाळे, विनोद मरसाळे व त्यांचा येवला येथील मामेभाऊ गुरू भालेराव यांनी गुरु वारी रात्री धुळे येथे एक डेअरीचे शटर तोडून ३२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले. एक दुचाकीवर हे संशयीत आरोपी मनमाड कडे निघाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच धुळे पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली. हे आरोपी नाशिककडे निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नाशिक पोलिसांना माहिती देऊन धुळे पोलीस या आरोपीच्या मागावर होते.इकडे मनमाड येथे पोहोचल्या नंतर भगतसिंग मैदान परिसरातील एका घराच्या छतावर चोरट्यांनी चोरून आणलेल्या ऐवजाचे वाटप सुरू केले. चोरीचा ऐवज वाटणीवरून त्यांच्यात आपापसात वाद झाला. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने सागर मरसाळे व विनोद मरसाळे यांनी त्यांचा जोडीदार गुरु भालेराव याच्यावर गोळी झाडली. जखमी झालेल्या भालेराव याने आरडाओरडा केला.या घटनेची माहिती मिळताच मनमाडचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मागावर असलेले धुळे येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. धुळे पोलिसांनी जखमी भालेराव व सागरला ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार झाला आहे. पोलीस दोन्ही आरोपींना धुळे येथे घेऊन गेले आहे. गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या आरोपीवर धुळे येथे उपचार सुरू आहे.पोलीस पथक धुळे येथे रवानाजखमी आरोपीचा जबाब नोंदवून घेण्यासाठी मनमाड पोलीस पथक धुळे येथे रवाना झाले आहे. त्याच्या फिर्यादीवरून मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हे तिन्ही आरोपी अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर मनमाड लोहमार्ग पोलिसात अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते.

टॅग्स :Crimeगुन्हाFiringगोळीबार