शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारेची सुवर्णपदकाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 17:22 IST

आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या आकांक्षाने तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले.

अशोक बिदरी 

मनमाड - उत्तरप्रदेशमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडियाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडची आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने उत्तम कामगिरी केली. या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत तिने तीन नवीन राष्ट्रीय विक्रमासह स्वतःचेच विक्रम मोडीत काढून सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

उत्तरप्रदेशच्या मोदीनगर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने इतिहास रचत खेळात  उत्तम कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या आकांक्षाने तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. आज सुरू झालेल्या महिला रँकिंग राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४० किलो वजनी गटात तिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत स्नॅच मध्ये ६० किलो वजन उचलून स्वतःचाच ५९ किलोचा विक्रम मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. तसेच क्लिन जर्क मध्ये ७१ किलो वजन उचलून पुन्हा एकदा स्वतःचाच ७० किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रमासह एकूण१३१ किलोचा नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित करून तीन नवीन राष्ट्रीय  विक्रम करत स्पर्धेतील सुवर्णपदक मिळविले आहे तिने  रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक देखील पटकावून महाराष्ट्रासाठी विजयी सुरवात केली आहे. पतियाळा भुवनेश्वर व आता मोदीनगर येथे नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावून हॅट्ट्रिक साजरी केली.          आकांक्षाला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक रमेश थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. एस. एस. पोतदार, गुरुगोविंद सिंग हायस्कुलचे अध्यक्ष बाबा रणजितसिंग, प्राचार्य सदाशिव सुतार, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, सचिव प्रमोद चोळकर, भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.