शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ममदापुर येथील पाणी टँकरच बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 19:45 IST

ममदापुर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र गेल्या आठ दिवसापासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमहिला आक्र मक : आठ दिवसा पासून नागरिकाचे हाल

ममदापुर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र गेल्या आठ दिवसापासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्याने पावसाळ्यात देखील परिसरातील छोटे मोठे बंधारे कोरडे होते तसेच विहिरींना पाणीच आले नाही. त्यामुळे परिसरातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, सोमठाण जोश, कोळगाव, रेंडाळा आदी गावांना मागील बऱ्याच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.गावातील टँकर दररोज येतो मग वाडी वस्तीवरील का येत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी व बोरवेल दोन्हीही कोरडेठाक असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्याची मोठी पंचायत झाली आहे. या परिसरातील शेतकरी हे आपल्या शेतातच राहतात. दरवर्षी शेतकºयांना पिण्यासाठी पुरेल एवढे पाणी विहिरींना असायचे किंवा बोरवेलला तरी पाणी शेतकºयांच्या कुटुंबाला व जनावरांना पिण्यासाठी पाणी असायचे, परंतु या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्यासाठी पाणी नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे हाल होत आहे. त्यामुळे शासनाने गावाबरोबरच वाडी-वस्तीवरील शेतकºयांना टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. शासनाने या सर्व परिस्थितीचा विचार करून त्या प्रमाणात वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी वाटप करणे गरजेचे आहे.परंतु टँकर चालक शेतकरी, महिला यांच्यावर आरेरावीची भाषा वापरून पाणी वाटप करतांना प्रत्येकांशी हुज्जत घालतो अशी ओरड आहे. त्यामुळे सदर टँकर बदलून मिळावा आशी मागणी होत आहे. गावची लोकसंख्या विचारात घेता एका टँकरचे पाणी अपूर्ण पडत असल्याने वाडी-वस्त्यांवर पिण्याचे पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. बहुतेक शेतकºयांचे घर हे त्याच्या शेतात असल्याने शासनाने वाडी-वस्तीवर दुसरा नवीन टँकर सुरु करावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणी पंचायत समिती सभापती यांच्याकडे ममदापूरच्या ग्रामस्थांनी तक्र ार केली आहे. टँकर चालकाच्या अरेरावीला नागरिक वैतागले असून दुसरा टँकर सुरू करावा अशी मागणी होत आहे. (फोटो १४ वॉटर शॉर्टेज)