निफाड : मांजरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार झाल्यानंतर परिसरात घबराट पसरली आहे. तालुक्यातील गंगाथडी भागातील मांजरगाव येथील गणपत सुखदेव हाडपे यांच्या शेतात मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यांसह मुक्कामी होते. गुरु वारी रात्री २ च्या सुमारास बिबट्याने जाळीच्या आत बसवलेल्या मेंढ्यांच्या कळपात उडी मारून एका मेंढीवर हल्ला करून तत्काळ पसार झाला. शेळ्या-मेंढ्यांच्या आवाजाने मेंढपाळ जागे झाले व त्यांनी शोध घेतला असता काही अंतरावर सदरची मेंढी मृतावस्थेत दिसली. ही मेंढी ज्ञानेश्वर माधव पारेकर (रा. कोंडार, ता. नांदगाव) या मेंढपाळाच्या मालकीची होती.सकाळी मात्र या मेंढपाळाच्या कळपासून काही अंतरावर दत्तू यशवंत सातपुते (रा. कोंडार, ता. नांदगाव) यांच्या मालकीचे घोड्याचे शिंगरू बिबट्याने हल्ला केल्याने मृत झालेले दिसले.सदरची घटना येवला वनविभागास तत्काळ कळविल्यानंतर येवला वनविभागाचे वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक दिलीप अहिरे, विजय लोंढे आदिंचे पथक घटनास्थळी पोहचले व घटनेचा पंचनामा केला. (वार्ताहर)
मांजरगावला बिबट्याचा थरार
By admin | Updated: June 2, 2016 23:35 IST