लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सुंदर ते ध्यान उभे विटेवरीकर कटेवरी ठेवोनिया...तुळशीहार गळा, कांसे पितांबरआवडे निरंतर तेची रूपा...म्हणत भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. जिल्हाभरात शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करत बालवारकऱ्यांनी काढलेल्या दिंड्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.त्र्यंबकेश्वर : ज्या वारकरी - भाविकांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही ते येथे येऊन संत निवृत्तिनाथांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीवर देवाचा चांदीचा मुखवटा व समाधीपुढे पादुका ठेवलेल्या असतात. पण देवाचा मुखवटा आणि पादुका दोन्ही पंढरपूरला नेण्यात आल्याने भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. यावेळी दर्शनासाठी रांग लागली होती. तसेच कुशावर्त तीर्थात स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती, तर बाजूच्या श्री गंगा- गोदावरी मंदिरात येथील पुरोहितांतर्फे शुक्ल यजुर्वेद संहिता पारायण सुरू होते. त्यामुळे एका पवित्र धार्मिक वातावरणाची भर पडत होती. त्र्यंबकेश्वर मंदिरातदेखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.सिन्नर : शहर व तालुक्यातील प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. विठूनामाचा गजर करीत बाल वारकऱ्यांनी काढलेल्या दिंड्यांमुळे जणू विठ्ठल नामाची शाळा भरल्याचे चित्र दिसू लागले होते.
भाविकांची मांदियाळी
By admin | Updated: July 4, 2017 23:42 IST