लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा आटोपून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पाऊण लाखाचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़८) दुपारी नारायणबापू चौकात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा मधुकर कोकाटे (रा.रविनारायणी रो हाउस श्रीरामनगर,जेलरोड) व त्यांच्या जाऊबाई या दुपारच्या सुमारास वटवृक्षाच्या पूजेसाठी नारायण बापू चौकात गेल्या होत्या. साडेतीन वाजेच्या सुमारास पूजा आटोपल्यानंतर टाकळी रोडने घराकडे पायी येत होत्या़ यावेळी समोरून लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने कोकाटे यांच्या गळ्यातील ७५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खेचून नेले़याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा करून परतणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र खेचले
By admin | Updated: June 9, 2017 17:37 IST