शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तरसाळीच्या सरपंचपदी मंगलाबाई मोहन बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:46 IST

सटाणा : तालुक्यातील तरसाळीच्या सरपंचपदी मंगलबाई मोहन तर उपसरपंचपदी काळू पिंपळसे यांची शुक्रवारी (दि.१२) बिनविरोध निवड करण्यात आली.

सटाणा : तालुक्यातील तरसाळीच्या सरपंचपदी मंगलबाई मोहन तर उपसरपंचपदी काळू पिंपळसे यांची शुक्रवारी (दि.१२) बिनविरोध निवड करण्यात आली.तरसाळी येथील सरपंच, उपसरपंचपदासाठी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मेधने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सरपंचपदासाठी मंगलबाई मोहन तर उपसरपंचपदासाठी सर्वानुमते काळू पिंपळसे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. या प्रक्रियेत विरोधी गट पूर्णपणे तटस्थ राहिल्याने सरपंचपदी मंगल मोहन तर उपसरपंचपदी वीर एकलव्य संघटनेचे काळू पिंपळसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. या निवडीनंतर थोर महापुरुषांच्या प्रतिमापुजन करण्यात आले, समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली.ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राकेश रौंदळ, प्रभाकर पवार, लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली समर्थ ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलने अपेक्षेनुरूप सलग दुसऱ्यांदा बाजी मारली असून या निवडणुकीत सत्ताधारी गटाला ६ तर विरोधी गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. यानंतर निघालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणातही पुन्हा एकदा या गटाला नशिबाची साथ मिळाली असून सरपंचपद ना.म.प्र.ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाले आहे. आरक्षित एकमेव जागा ही मंगलबाई मोहन यांच्या रूपाने या गटाकडेच असल्याने मोहन परिवाराला तब्बल चाळीस वर्षानंतर गावाचे सरपंचपद मिळाले आहे. निवडणूक कामी तलाठी स्नेहल अहिरे, ग्रामसेवक एन. एम. देवरे, कर्मचारी विजय रौंदळ, बाळा सोनवणे, मोठाभाऊ बागुल आदींनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लखन पवार, नामदेव बोरसे, निंबाबाई माळी, कमल गांगुर्डे आदींसह तात्याजी रौंदळ, मन्साराम जाधव, सुरेश रौंदळ, प्रभाकर पवार,राकेश रौंदळ,अरूण मोहन, भिका रौंदळ, रामदास पवार, खंडू मोहन, प्रकाश मोहन, रोहिदास सोनवणे, शिवाजी सोनवणे, शामा पिंपळसे, देवाजी वाघ, त्र्यंबक गांगुर्डे, विठोबा पिंपळसे, प्रभाकर रौंदळ, यादू चव्हाण, जिभाऊ माळी, साहेबराव रौंदळ, विजय पवार, सुरेश पिंपळसे, गोपिनाथ मोहन,पुंडलिक रौंदळ, रमेश मोहन, जयराम मोहन, बापु वाघ, भैया वाघ, बाळू मोहन, निखिल जाधव, किरण जाधव, रोहीत पवार, नानाजी पवार, मुन्ना जाधव, गणेश रौंदळ, सुरेश पवार, संजय पवार, रविंद्र पवार, मिना पवार, रत्ना जाधव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक