शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात मांडुळाची तस्करी; तिघा विद्यार्थ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 02:17 IST

मांडूळ सापाची तस्करी करताना सटाणा पोलिसांनी मांडुळासह अभियांत्रिकी महाविद्यालयीन तीन विद्यार्थ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तिघांकडून दोन तोंडाचा एक मांडूळ जप्त करण्यात आला आहे.

सटाणा : मांडूळ सापाची तस्करी करताना सटाणा पोलिसांनी मांडुळासह अभियांत्रिकी महाविद्यालयीन तीन विद्यार्थ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तिघांकडून दोन तोंडाचा एक मांडूळ जप्त करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत लाखो रुपये किंमत मिळत असल्याने मांडुळाची तस्करी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.सटाणा पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत मांडुळासह तिघांना वनविभागाकडे सुपूर्द केले आहे. सटाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी (दि. १९) तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.शहरातील राधाई लॉजवर मांडूळ सापाची अवैध विक्री करण्याच्या तयारीत काही तस्कर असल्याची गोपनीयमाहिती सटाणा पोलिसांना मिळालीहोती. सटाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, उपनिरीक्षक गणेश बुवा, हवालदार कैलास खैरनार, विजय वाघ, योगेशगुंजाळ, जिभाऊ बागुल यांनी लॉजवर छापा टाकला. (पान ५ वर)छाप्यात यश संजय निकम (रा.आराई ता.सटाणा) व मयूर नागेश सोनवणे (रा.साक्र ी) यांची विचारपूस करून त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यांच्याजवळ मांडूळ जातीचा सर्प आढळून आला.पोलिसांनी दोघांकडे सखोल चौकशी केली असता यश निकम याचा मामा स्वप्नील दादासाहेब पगार (रा.आघार खुर्द ता.मालेगाव) यांच्याकडून मांडूळ मिळाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी स्वप्नील पगार यालाही ताब्यात घेत वनविभागाच्या हवाली केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक