शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मंदार गाडगीळ यांची  संगीत मैफल रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:17 IST

देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नियमाने, कुणी रखडती धुळीत अन् कोणास लाभे प्रेम हे नाट्यगीत असो किंवा जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले हे भक्तिगीत असो, नाशिकरोडच्या रसिकांचे कान तृप्त झाले.

नाशिकरोड : देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नियमाने, कुणी रखडती धुळीत अन् कोणास लाभे प्रेम हे नाट्यगीत असो किंवा जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले हे भक्तिगीत असो, नाशिकरोडच्या रसिकांचे कान तृप्त झाले. जेलरोडच्या कोठारी कन्या शाळेत पुण्याचे नवोदित गायक मंदार गाडगीळ यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगली.नाशिकरोड परिसरात सुगम व शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा, यासाठी येथील पं. शंकरराव वैरागकर प्रतिष्ठानतर्फेमासिक संगीत सभा आयोजित केली जाते. यंदा गाडगीळ यांची मैफल रंगली. या कार्यक्र मात सुरुवातीला मंदार गाडगीळ यांनी राग मुलतानी विलंबित रागात सादर करून त्यात एक गोकुळ लकेवा ही बंदिश सादर केली. मंदार यांनी मध्यंतरानंतर राग भूपाली गात रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. गाडगीळ यांनी देवाघरचे ज्ञात कुणाला हे नाट्यगीत सादर केले.पंडित शंकरराव वैरागकर यांनी रसिकांना मार्गदर्शन केले. अजित बने, प्रा. सुनील देवधर, नितीन काळे, श्रीकांत कुलकर्णी, सुनील गुरव, गोपाल सौंदाणे, सुरेखा शिंदे, सरला देशमुख आदी उपस्थित होते. ओंकार वैरागकर यांनी स्वागत तर सरिता वैरागकर यांनी प्रास्ताविक केले.रसिकांची दादमंदार गाडगीळ यांच्या आलापातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सरगम अतिशय समर्पक पद्धतीने सादर करत समेवर येऊन रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली. त्यानंतर मध्यलतीत एक तालामध्ये नैनन मे आणबाण ही बंदिश त्यांनी सादर केली. त्यांना तबल्यावर कुमार संगीत कुलकर्णी आणि संवादिनीवर सागर कुलकर्णी यांनी साथसंगत केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक