शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

मंडळांना परवानगीसाठी ‘एक खिडकी’

By admin | Updated: September 11, 2015 23:02 IST

महापौर : गणेशोत्सवासंदर्भात महापालिकेत बैठक

नाशिक : गणेश मंडळांनी अगोदर पोलिसांची परवानगी घेऊन यावी त्यानंतर महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील, असे स्पष्ट करतानाच मंडप उभारताना रस्त्यांवर खड्डे न पाडण्याचे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केले. येत्या १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अडचणी मांडतानाच सूचनाही केल्या. रविवार कारंजा मित्रमंडळाचे पोपटराव नागपुरे यांनी रस्त्यांवर खड्डे पाडल्यास करण्यात येणाऱ्या दंडात्मक तरतुदीला आक्षेप घेतला. प्रायोजकांच्या माध्यमातून लावण्यात येणाऱ्या जाहिरातींवर कर आकारण्यात येऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली. पेठरोडवरील श्रीमान सत्यवादी मंडळाचे लक्ष्मण धोत्रे यांनी सिंहस्थामुळे रस्त्यांवर टाकण्यात आलेले बॅरिकेडिंग पर्वणी संपल्यानंतर लगेच हटविण्याची सूचना केली. नाशिक जिल्हा गणेशोत्सव समितीचे सरचिटणीस हेमंत जगताप यांनी महापालिकेने परवानग्यांसाठी एक खिडकी पद्धत अवलंबावी, वीजपुरवठा खंडित होऊ नये, अशी मागणी केली. विडी कामगारनगर येथील गणेश आवनकर, पेठफाटा मित्र मंडळाचे नंदू पवार, आरटीओ कॉर्नर मंडळाचे रवि गायकवाड, रामानंद देशमुख, करणसिंग बावरी यांनीही मूर्ती संकलनासाठी विसर्जन कुंड चौकाचौकात उपलब्ध करून द्यावे, मंडपाजवळ निर्माल्य कलश ठेवावेत, स्वच्छता राखावी आदि मागण्या केल्या. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले, गणेश मंडळांना आवश्यक त्या सुविधा महापालिकेमार्फत पुरविण्यात येतील. मंडप उभारताना रस्त्यांत खड्डे पडणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी. त्यासाठी फोल्डिंगचे मंडप उभारावेत. दुष्काळाचे सावट आणि दहशतवादी कारवायांची भीती यामुळे मंडळांनी प्रबोधनही करावे. ज्या मंडळांनी यापूर्वी वीजजोडणीसाठी अनामत रक्कम भरली असेल, ती परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही महापौरांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, शिक्षण सभापती संजय चव्हाण, अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे व अनिल चव्हाण, शहर अभियंता सुनील खुने, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, दत्तात्रेय गोतिसे, रोहिदास बहिरम आदि उपस्थित होते.