शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने महावितरणला बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:28 IST

नाशिक : महापालिकेची परवानगी न घेता महावितरणने विविध भागात वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली. त्यामुळे समतोल बिघडल्याने अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत असून, त्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर उद्यान विभागाने महावितरणच्या विभागीय कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत.पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणच्या वतीने शहरातील विविध भागातील झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. विशेषत: ओव्हरहेड वायर असलेल्या ठिकाणी फांद्यांची छाटणी ...

नाशिक : महापालिकेची परवानगी न घेता महावितरणने विविध भागात वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली. त्यामुळे समतोल बिघडल्याने अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत असून, त्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर उद्यान विभागाने महावितरणच्या विभागीय कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत.पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणच्या वतीने शहरातील विविध भागातील झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. विशेषत: ओव्हरहेड वायर असलेल्या ठिकाणी फांद्यांची छाटणी केली जाते. अन्यथा पावसाळ्यात झाड्याच्या फांद्या तारांवर पडून वीजतारा जोडल्या जातात आणि अपघात संभवतो. तसेच शॉर्टसर्किटमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वतीने ही कामे केली जातात. परंतु अशी कामे करताना मात्र अनेकदा केवळ तारांवर येणाऱ्या फांद्या छाटल्यानंतर झाडांचा तोल जातो आणि ती पडण्यास येतात. शहरात अशी शेकडो झाडे धोकादायक असून, चालू महिन्याच्या प्रारंभी आलेल्या पहिल्याच पावसात सुमारे पन्नास ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्या होत्या तशी अग्निशामक दलाकडे नोंददेखील आहे.महावितरणकडून केवळ एकाच बाजूने वृक्षाचा घेर कमी करण्याचे प्रकार घडत असल्याने धोकादायक झालेल्या वृक्षांबाबत ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले होते. सदरचे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने महावितरणने ज्या ज्या भागात वृक्षतोड केली अशा सर्व विभागीय कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने या नोटिसा बजावल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनी दूरध्वनी करून चर्चा केल्याचे वृत्त आहे. वृक्षाचा घेर कमी करणे किंवा फांद्या छाटण्याबाबत प्रशासन यापूर्वी फारसे गांभीर्याने घेत नव्हते.

टॅग्स :electricityवीजNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका