सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील एक गावात घरात खेळणाऱ्या सात वर्षीय बलिकेचा विनयभंग करणाऱ्या 29 वर्षीय तरुणाविरोधात वावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.26 दुपारी 3 वाजेच्या सुमारास सदर युवकाने बलिकेचा विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. बलिकेने घरी याबाबत सांगितल्यावर नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला.योगेश जगन्नाथ नाजगड (29) रा. शहा असे संशयिताचे नाव आहे. बलिकेच्या वडिलांनी वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान संशयितास पोलिसांनी अटक केली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभय ढाकणे अधिक तपास करीत आहेत.
बलिकेचा विनयभंग करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 01:23 IST
सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील एक गावात घरात खेळणाऱ्या सात वर्षीय बलिकेचा विनयभंग करणाऱ्या 29 वर्षीय तरुणाविरोधात वावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलिकेचा विनयभंग करणाऱ्यास अटक
ठळक मुद्देवावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल