शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

मामको बॅँक निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण

By admin | Updated: October 29, 2015 21:58 IST

शनिवारी प्रचार तोफा थंडावणार : रविवारी मतदान, तर सोमवारी मतमोजणी

शफीक शेख ल्ल मालेगावमालेगाव मर्चण्टस् को-आॅप. बॅँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी येत्या ३१ आॅक्टोबर रोजी थंडावणार आहेत. रविवारी १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.मतदानासाठी ५२ बूथ उभारण्यात येणार असून त्यात दोन फर्म प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एटीटी आणि जेएटी विद्यालयात मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. मामको बॅँकेचे एकूण २० हजार ५४२ मतदार असून एका मतदान केंद्रावर सुमारे ४०० मतदार मतदान करतील.पोलीस बंदोबस्त :- मामको बॅँक निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात मतदान केंद्रासाठी ६ पोलीस अधिकारी, २० पोलीस कर्मचारी आणि १० महिला पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.३५० कर्मचारी : मामको बॅँक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे एकूण ३५० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक बूथवर २६० कर्मचारी नियुक्त केले असून १० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.मतमोजणी ऐश्वर्या मंगल कार्यालयात : मालेगाव मर्चंट्स बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी ऐश्वर्या मंगल कार्यालयात मतमोजणी सुरू होईल. मतपेट्या ऐश्वर्या मंगल कार्यालयाच्या स्ट्रॉँगरूममध्ये ठेवण्यात येणार असून त्यासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.मतमोजणीचे शूटिंग : ऐश्वर्या मंगल कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीसाठी एक पोलीस अधिकारी, सहा महिला कर्मचारी, तीन महिला पोलीस अधिकारी नियुक्त असतील. प्रत्येक मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे. त्याचे रेकॉर्डिंग केले जाईल.मतदानासाठी ओळखपत्र : मामकोसाठी मतदान करताना मतदाराला फोटो आयडी आणावे लागेल. मतदान प्रतिनिधी, उमेदवार, मतमोजणीला प्रतिनिधी यांचेसाठी ओळखपत्र आवश्यक असेल त्याशिवाय कुणालाही प्रवेश करता येणार नाही.या प्रक्रियेदरम्यान सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण म. रा. पुणे यांनी नियुक्त केलेले मतदानासाठीचे १७ प्रकारचे पुरावे, ज्यात भारतीय राज्य निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्तरावर संस्था यांनी सदस्यांना दिलेले ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बॅँक, पोस्ट यात फोटो असणारे पासबुक, सक्षम प्राधिकरण, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जाती यांना फोटोसहीत दिलेले प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणातर्फे दिलेल्या फोटोसह अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेबाबतची कागदपत्रे, नोंदणी, फोटोसहीत देण्यात आलेला शस्त्र परवाना, निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पासबुक, केंद्राच्या श्रम मंत्रालयाने दिलेला आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत ओळखपत्र, फोटोसहीत असलेली शिधापत्रिका, आधारकार्ड आदि पुराव्यांशिवाय कुणालाही मतदान करता येणार नाही. ३१ ला प्रचार बंद : शनिवारी (दि. ३१) निवडणूक प्रचार थांबणार आहे. मतमोजणीसाठी २६ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी सांगितले.